ओशाे - गीता-दर्शन

    11-May-2023
Total Views |
 
 

Osho 
आपल्या चहूकडे फुलं पसरली, सगळीकडे एक सुगंध शिंपडून ठेवला, आपल्याभाेवती धूप जाळत ठेवला तर मग आपण आता एका विशेष उपस्थितीनं वेढले जाता. या विशेष उपस्थितीत काही गाेष्टींचा विचार करणे अवघड जाईल आणि काही गाेष्टींचा विचार करणे साेपे जाईल. जर सगळीकडे सुगंध दरवळत असेल तर दुर्गंधाचा विचार येणे अवघड हाेईल. एक विशेष प्रकारचं गवत, विशेष प्रकारचा धूप, जाे ध्यानाच्या माध्यमातून शाेधला गेला हाेता, त्याचा उपयाेग ध्यानासाठी हाेऊ शकताे. त्याची स्वतःची परिपूर्ण वैज्ञानिक प्रक्रिया आहे.लुकमानच्या आयुष्याबाबत असा उल्लेख आहे.लुकमान राेपाजवळ जाई, ताे तिथं डाेळे मिटून ध्यानात बसे, अन् राेपांना विचारी, ‘तू कशात उपयाेगी पडशील, मला सांग बघू?
 
तुझी पाने कशात उपयाेगी पडतील? काेणत्या आजारात उपयाेगी पडतील तुझी मुळं, तुझी साल कशासाठी उपयाेगात आणता येईल?’ ही गाेष्ट अजब वाटते नाही का? पण लुकमानने लाखाे राेपट्यांचे, पानांचे, मुळांचे त्यांच्या उपयाेगाबाबतचे विवरण दिले आहे.
राेपे सांगतील हे असंभव वाटते. पण जेव्हा लुकमानचं पुस्तक हाती आलं, ते पाहून वैज्ञानिकांना आणखी एक गाेष्ट तर आणखीनच असंभाव्य वाटते. त्याच्याजवळ प्रयाेगशाळा असेल, जिच्यामध्ये लाखाे, काेट्यवधी वनस्पतींचा शाेध ताे लावील हे आणखीनच असंभव वाटतं. कारण लॅबाेरेटरी मेथड, केमिकल अ‍ॅनाॅलिसिस यांचा विकास अगदीच अलिकडचा आहे. लुकमानच्या वेळी तर या गाेष्टी नव्हत्याच.