पत्र साेळावे
प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. ‘‘अथाताे ब्रह्मजिज्ञासा’’ हे महान सूत्र आहे. जाणून घेण्याची इच्छा झाल्याशिवाय सांगू नये.गीतेबद्दल तुला पराकाष्ठेचा आदर वाटू लागला आहे व त्या निमित्ताने तुला खूप गाेष्टी जाणून घेण्याची इच्छा झाली आहे, ही फार चांगली गाेष्ट आहे.तू आपल्या पत्रात लिहितेस- ‘‘गीतेने ज्ञान, कर्म व भ्नती यांचा समन्वय केला आहे व हा समन्वय करताना भ्नतीवर फार माेठा जाेर दिला आहे.हा तुमचा विचार मला पटताे. मी एके ठिकाणी वाचले की- ‘‘निंबाळचे संत गुरुदेव रानडे यांच्याइतका महान तत्त्वज्ञानी अलीकडच्या काळात झाला नाही. गुरुदेवांनी गीतेला फार मान दिला व गीतेची शिकवणूक आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला.त्यांचे जीवनचरित्र समजून घ्यावे म्हणजे फार फायदा हाेईल. आपल्या जीवनात खूप पारमार्थिक अनुभव घेऊन जीवनाच्या संध्याकाळी त्यांनी गीतेवर ग्रंथ लिहून आपल्या दृष्टीने गीतेचे विशिष्ट तात्पर्य काढले. ते तात्पर्य समजून घेणे हितावह आहे.’’ - हा मजकूर वाचल्यापासून गुरुदेव रानडे यांचे चरित्र थाेड्नयात समजवून घ्यावे अशी मला उत्कंठा लागली आहे.
कृपा करून तुम्ही मला या बाबतीत थाेड्नयात जरूर त्या गाेष्टी सांगा...’’ तुझी इच्छा चांगली आहे. गुरुदेव रानडे हे अलीकडच्या काळातील महान तत्त्वज्ञ हाेते. डाॅ. राधाकृष्णन् यांनी त्यांच्याबद्दल म्हटले आहे.‘" I speak philosophy but prof. Ranade lives philosophy." .‘ (मी तत्त्वज्ञान बाेलताे, पण प्रा. रानडे तत्त्वज्ञान जगतात.) प्रा. रानडे यांचा जन्म जमखंडी येथे ता. 3 जुलै 1886 राेजी झाला. शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी इ.स.1901 मध्ये भाऊसाहेब उमदीकर यांच्याकडून नाम घेतले व ते नामजप करू लागले. ते फार हुशार हाेते. मॅट्रिकच्या परीक्षेत शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली तरच आपले गुरू खरे असे मनाशी ठरवून त्यांनी नामस्मरण केले. ते खूप अभ्यास करत असत व नामस्मरणही करत असत. 1902 मध्ये त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेत जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली व या शिष्यवृत्तीचा लाभ त्यांच्या ऐहिक व पारमार्थिक जीवनास पाेषक ठरला.
मॅट्रिक झाल्यानंतर रामभाऊ रानडे पुण्याच्या काॅलेजात दाखल झाले. बी.ए. ला त्यांनी गणित हा ऐहिक विषय घेतला व 1907 मध्ये ते बी.ए.ची परीक्षा दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्या वर्षाचे भाऊ दाजी पारिताेषिक त्यांना मिळाले. काॅलेजात असताना त्यांचे नामस्मरण चालू असे.बी.ए. झाल्यावर रामभाऊ डे्नकन काॅलेजात दाेन वर्षे फेलाे हाेते. पुढे त्यांची प्रकृती बिघडली व टी.बी.चा विकार त्यांना जडला. 1914 मध्ये ते फर्ग्युसन काॅलेजात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. नंतर तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते पहिल्या वर्गात एम.ए. उत्तीर्ण झाले.निकालाच्या आधी त्यांनी स्वप्नात ‘"First class First, Chanceller's Medal" अशी तार आल्याचे पाहिले व नंतर प्रत्यक्षात तसे घडले. त्यांचे पेपर पाहून परीक्षकांनी त्यांच्याबद्दल म्हटले - ‘"The examinee knows more than the examiners." .‘ प्रकृती बरी राहात नाही या कारणासाठी रामभाऊंनी 1924 साली डी.इ. साेसायटीचा राजीनामा दिला आणि ते निंबाळास येऊन राहिले.