वाच्यार्थ : मूर्ख मनुष्य पंडित, विद्वान व्यक्तींचा; निर्धन व्यक्ती धनिकांचा; वेश्या कुलीन शीलवतींचा, अभागी व्यक्ती भाग्यवानाचा द्वेष करते.
भावार्थ : आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत असणाऱ्यांचा (ज्यांना समाजात सन्मान मिळताे अशांचा) नेहमीच द्वेष करणे हा मनुष्यस्वभाव आहे. म्हणूनच - 1. मूर्ख आणि पंडित : ज्याची ग्रहणशक्ती मुळातच कमी ताे ज्ञान प्राप्त करू शकत नाही, कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. समाजात त्याची सदैव हेटाळणीच हाेते.