ओशाे - गीता-दर्शन

    07-Apr-2023
Total Views |
 
 

Osho 
 
गहन अर्थानं काय फरक पडताे? आत्म्याचं काही आसन असतं का कुठलं? खाेल खड्ड्यात बसल्यास आत्मा मिळणार नाही? उंचावर बसलं तर आत्मा मिळणार नाही? जर अशा छाेट्या अटींवर आत्मा मिळणं अवलंबून असेल तर मग हा खेळ फारच स्वस्त झाला म्हणायचा. नाही, कुठही बसलं तरी आत्मा मिळेलच. तरीही जिथं आपण आहाेत, तिथं इत्नया छाेट्या गाेष्टींनीही फरक पडेल. कारण आपण इतके छाेटे आहाेत आपली आत्ताची जी अवस्था आहे तिच्यामुळे अगदी क्षुद्र गाेष्टींनीसुद्धा फरक पडेल.जेव्हा कधी ध्यानासाठी बसलेले असाल तेव्हा लक्षात येईल. जमीन थाेडीशी जरी तिरकी असली तरी सगळा वेळ त्या तिरकेपणातच मन गुंतून गेल्याचं नंतर लक्षात येईल.
 
पायाखाली बारीकसा दगड टाेचत असला तर परमात्म्याकडे लक्ष न राहता सगळा वेळ त्या दगडाकडेच लक्ष राहिलंय असं नंतर लक्षात येईल. एक मुंगी चावत असली तर परमात्म्याहून मुंगी माेठी असल्याचं लक्षात येईल. इतका प्रयत्न करीत आहे तरीपरमात्म्याकडे ध्यान जात नाहीये ,अन् मुंगीकडे दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी सगळं लक्ष तिच्याकडेच जातंय.आपण जिथं उभे आहाेत तिथे सगळ्या सीमांनी, अगदीच क्षुद्र गाेष्टीनी घेरले गेलाे, जिथं आपण क्षुद्र विषयाहून दुसऱ्या कशाकडेचकधी लक्ष दिलं नाही तिथे फरक पडेल. तिथे आपण काेणत्या स्थितीत बसलाेत, याच्याने फरक पडेल.बसण्याची काेणती जमीन निवडलीय, कशावर बसलाे आहाेत याच्यानेही फरक पडेल