नियम थाेडा करावा, पण ताे शाश्वताचा असावा

    07-Apr-2023
Total Views |
 

Gondavlekar
ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालताे, त्याची मशागत करताे, त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरविताे, परंतु जे झाड वाढू नये असे वाटते, किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करताे. तसे, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर हाेईल त्याची जाेपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपाेआपच त्यांचा विसर पडेल.ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जाेपासना करताना, त्याला गुराढाेरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भाेवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा; ताे जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते.
म्हणून परमार्थ हा काेणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे काही कुणी राेज उकरून पाहात नाही, त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचीतीच्या मागे लागू नका; त्यामुळे प्रगती खुंटेल.हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात; कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले परमार्थांत नियम थाेडाच करावा, पण ताे शाश्वताचा असावा; म्हणजे, जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा, आणि ताे प्राणाबराेबर सांभाळावा.जे अत्यंत थाेर भाग्याचे असतात, त्यांनाच ध्यानमार्ग साधताे. हा मार्ग ार थाेरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडताे; त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वष सुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही हाेणार नाही.आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम; दानात दान म्हणजे अन्नदान; आणि उपासनेत उपासना म्हणजे सगुणाची उपासना हाेय; या तिन्हींमुळे देहाचा विसर पडताे. म्हणून शक्य ताे या तीन गाेष्टींची कास धरा.
मनुष्याची साहजिक प्रवृति व्याप वाढविण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असताे हेही खरे. साधे मधमाश्यांचे उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गाेळा करतात आणि नंतर ताे पाेवळ्यात एकत्र करतात असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गाेड साठा हाेऊ शकताे बरे ! अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत, म्हणजे एक राम, पाहायला शिकावे, आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वत:मध्येच राम पाहून, प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वत:मध्ये राम पाहिल्याशिवाय ताे सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वत:च्या म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच हाेईल.म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा.