भावार्थ : काही गाेष्टी परस्परविराेधी आहेत.
1. लाेभ : महत्त्वाकांक्षा आणि अधिकार-महत्त्वाकांक्षी नसणारी, निर्मळ मनाची व्यक्ती अधिकाराच्या पदावर जाऊ शकत नाही. याउलट असेही म्हणता येते की, अधिकारी हा कधीच निर्माेही किंवा महत्त्वाकांक्षाविहीन नसताे.
2. कामातुरता आणि अलंकारप्रियता : कामाेत्सुक व्यक्तीला सजणे-धजणे आवडते, शृंगार आवडताे किंवा शृंगार करणारी व्यक्ती कामाेत्सुक असते.
3. सत्यप्रिय आणि गाेड बाेलणे : सत्यप्रिय व्यक्ती सत्य कटू असले तर कटूच बालते; गाेड (खाेटे) बाेलत नाही