ओशाे - गीता-दर्शन

    05-Apr-2023
Total Views |
 
 

Osho 
 
कारण मी जिथं उभा असेन तिथं आता दारदरवाजा काहीच नाहीये.पण मंदिरात येण्यासाठी तुम्हाला पायऱ्या, दरवाजे या साऱ्यांचीच आवश्यकता आहे. तरच तुम्ही मंदिरात येऊ शकाल. एकदम टाेकाची विधानं, अंतिम व्नतव्यं असतात. ती बराेबर असूनही उपयाेगी नसतात.कृष्ण अशा काही गाेष्टी सांगत आहे, की जे पूर्णपणे बराेबर नाहीये, पण तरी उपयाेगी आहे.अन् कित्येकदा कृष्णासारख्या शिक्षकांना अशा गाेष्टी सांगाव्या लागल्या आहेत, ज्या सांगणं त्यांना भाग पडलं असलं पाहिजे. तुम्हाला पाहून, तुमचं दुबळेपण पाहून. ती व्नतव्य तुमच्यावर अवलंबून आहेत, तुमचं दुबळेपणा, तुमच्या मर्यादा यावर अवलंबून आहेत.उदाहरणार्थ - कृष्ण सांगत अहे आसनाबद्दल.
 
ते जास्त उंच नसावं, फारस खाेल नसावं. जी माणसं आत पाेहाेचली, त्यांना कसलं उंच न् कसलं सखल! त्यांना कसलं आसन न् कसलं काय! आत पाेहाेचलेला माणूस म्हणू शकताे की आसन लावल्यानं काय हाेणार, सगळं व्यर्थ आहे, जसं कबीरासारख्यांनीं अनेक ठिकाणी म्हटलं आहे.कबीरांचं काही चूक नाहीये, ते एकदम बराेबरच सांगताहेत. पण कबीर जे सांगताहेत त्यात आणि तुमच्यात एवढं अंतर आहे की ते अंतर कमी हाेणं कधी श्नय नाही.कबीर म्हणतात, ‘बसण्यासाठी मृगाजिन पसरल्यानं काय हाेणार?’ त्यांचं म्हणणं ठीकच आहे, त्यात काहीही चुकीचं नाहीये.हरणाचं चामडं पसरलं, त्यावर आपण बसलाे तर त्यामुळे काय हाेईल?