एक गाेष्ट किंवा एक व्यक्ती दुसऱ्यासारखी नसते.अगदी काही मूलभूत गाेष्टी समान असूनही! काहीतरी सूक्ष्मातिसूक्ष्म फरक हा असताेच! म्हणून निरक्षर लाेकांसाठी अंगठ्याचे ठसे महत्त्वाचे असतात.पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा हा इतरांहून वेगळा असताे. निसर्गातील ही विविधता म्हणजे ारच माेठे आश्चर्य आहे.
वाच्यार्थ : महत्त्वाकांक्षा नसणारी व्यक्ती कधीच अधिकारी नसते.नटण्या-मुरडण्याची हाैस असणाऱ्या व्यक्तीत अधिक कामवासना असते. सत्यवचनी आवडेल असे गाेड बाेलत नाही. स्पष्टवक्ता कधीच फसवत नाही.