उदा. एखादा माणूस आपल्या घरी झाेपलेला असावा. त्याला तेथून तशा झाेपलेल्या अवस्थेतच उचलावे आणि बगीच्यात ठेवावे.तिथं त्याचे डाेळे उघडल्यावर त्यानं सगळं ठाकठीक म्हणावे, आणि कुणी त्याला विचारावे, बगीच्यात कसे आलात? तर त्याने उत्तरावे, ‘बस्स रस्ता वगैरे काही नाही. फ्नत तुम्ही या. जागे व्हा आणि जागे झालात की आपण बगीच्यात आहाेत हे तुमच्या लक्षात येईल.’ अगदी बराेबर अशीच अवस्था कृष्णमूर्तींची आहे. त्यांच्या म्हणण्यात चूक तर काहीच नाहीये.पण कृष्णमूर्तींना बगीच्यात घेऊन येणारी काही माणसं हाेती. अॅनी बेझंट हाेत्या, लेड बीटर हाेते.
त्यांनी कृष्णमूर्तींच्या बालपणातच जेव्हा त्यांना जवळजवळ काहीही जाण नव्हती तेव्हाच त्यांच्यावर प्रयाेग केले हाेते. त्यामुळेच कृष्णमूर्तींना आपल्या बालपणाची काहीही आठवण नाही. लहानपणचं त्यांना काहीएक आठवत नाहीये. त्यांचं बालपण अन् ते यामध्ये एक प्रचंड दरी आहे. एक खूप माेठी दरी आहे.आपल्या मातृभाषेची त्यांना काहीएक आठवण नाहीये. खरं म्हणजे, नऊ-दहा वर्षांचा मुलगा आपली मातृभाषा कधीच विसरत नसताे. या वयाचा मुलगा आपली भाषा बरीच शिकलेला असताे. आपली भाषा जवळजवळ संपूर्ण शिकलेला असताे.पण कृष्णमूर्तींना त्याची काहीच आठवण नाही.