गीतेच्या गाभाऱ्यात

    28-Apr-2023
Total Views |
 
 
पत्र चाैदावे
 
Bhagvatgita
चित्रकार म्हणाला - ‘‘आपण अगाेदर मला दूर बसवले पण आता खूप आदरसत्कार करत आहे, हे असे का?’’ नेपाेलियन म्हणाला- ‘‘प्रथम माणसाची किंमत त्याच्या कपड्यावरून केली जाते. पण नंतर त्याची किंमत त्याच्या गुणांवरून केली जाते.तू लिहितेस- ‘‘काही लाेक चांगले काम करत असतात, पण दुसरे काही लाेक त्यांना नावे ठेवत असतात. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या लाेकांना पराकाष्ठेचा मनस्ताप हाेताे. हा प्रकार वाईट नाही का?’’ जग हे असेच आहे, आपण चांगले काम करत असावे.लाेकांनी नावे ठेवली तरी मनाचा समताेलपणा बिघडू देऊ नये. जाे खरा तत्त्वज्ञानी आहे, ताे लाेकांनी शिव्या दिल्या तरी आनंदी असताे.लाेक चहाबराेबर काहीतरी खातात. लाेकमान्य टिळक म्हणायचे- ‘‘तुम्ही चहाबराेबर चिवडा, शंकरपाळी किंवा बिस्कीटे खाता. माझे खाणे वेगळे आहे. मी चहाच्या वेळी वर्तमानपत्र वाचताे. वर्तमानपत्रात मला शिव्या दिलेल्या असतात.
 
चहाबराेबर त्या शिव्या मी आनंदाने खाताे.’’ * * * स्त्रियांना काेणी कमी लेखले की तुला राग येणे साहजिकच आहे. गीतेने स्त्रियांना कमी लेखले नाही. आपल्याकडचे काही लाेक स्त्रियांना कमी लेखतात हे खरे आहे. पाश्चात्य लाेक स्त्रियांना कमी लेखत नाहीत, हा तुझा समज बराेबर नाही.आपल्याकडे काही लाेक ज्याप्रमाणे स्त्रियांना कमी लेखतात त्याप्रमाणे पाश्चात्यांपैकी काही विद्वान देखील स्त्रियांना कमी लेखतात. तुला नीत्स्ये ह्याचे नाव ऐकून माहीत असेल. ताे म्हणताे- ‘‘विद्वान स्त्री हा वदताे व्याघात आहे. स्त्री ही जात्याच हल्नया जातीचा प्राणी आहे. स्त्री ही पुरुषाच्या प्रेमाची नव्हे तर सत्तेची वस्तू आहे.’’ पाऊण पत्र झाल्यानंतर तू एका प्याऱ्यात प्रश्नांचा पाऊस पाडला आहेस. उन्हाळा संपत असताना पडणारा पहिला पाऊस पाहून जसा आनंद हाेताे तसाच आनंद तुझ्या त्या प्रश्नांच्या पावसाने मला झाला आहे. तुझ्या प्रश्नांची उत्तरे थाेड्नयात अशीसात्त्विक मनुष्याच्या अंगी रजाेगुण व तमाेगुण अजिबात असत नाहीत असे नाही. माणसाच्या अंगी तिन्ही गुणांचे मिश्रण असते.
 
त्याचा सत्त्वगुण इतका बलाढ्य असताे की, रजाेगुण व तमाेगुण यांचे त्या सत्त्वगुणापुढे चालत नाही, ताे सात्त्विक. ज्याचा रजाेगुण इतका बलाढ्य असताे की सत्त्वगुण व तमाेगुण यांचे त्या रजाेगुणापुढे चालत नाही, ताे राजस. ज्याचा तमाेगुण इतका बलाढ्य असताे की, सत्त्वगुण व रजाेगुण याचे त्या तमाेगुणापुढे चालत नाही, ताे तामस.आपल्या अंतरंगात जी दिव्यश्नती आहे ती त्रिगुणातीत आहे. ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपले कल्याण हाेते.‘एकाकी न रमते’ ह्याचा अर्थ असा केला जाताे की, बायकाेशिवाय पुरुषाला मजा वाटत नाही. असा त्याचा अर्थ नाही. आपल्या अंतरंगातील दिव्यश्नतीचा शाेध आपणाला जाेपर्यंत लागत नाही ताेपर्यंत आपण एकाकी असताे. ताेपर्यंत आपणाला खरी मजा वाटत नाही. एकदा अंतरंगातील दिव्यश्नतीचा शाेध लागला व त्या श्नतीशी आपला सहवास सुरू झाला म्हणजे आपल्या जीवनात खरी मजा येते.