संसारवृक्षाचेच वर्णन पुन्हा चालू झाले आहे. हा संसारवृक्ष बळकट आणि अमर्याद आहे.याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमचहाेतील. याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम काेणासही जमण्यासारखे नाही.नुसती ुंकर मारून आकाश संपेल काय? मृगजळाच्या पाण्याने भाताची शेती व केळीची बाग पिकवता येईल काय? या वृक्षाला अंत नाही. हा संसारवृक्ष अनादि आहे. हे एका दृष्टीने खरे असले तरी त्याचे रूप सत्य नसल्यामुळे त्याचा आरंभ काेठून म्हणावयाचा? याचे अनादिपण काेठे शाेधावयाचे? आकाशाच्या ुलाचा देठ काेणी ताेडावयाचा? वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका कशी मांडावयाची? त्याप्रमाणे अर्जुना, हा संसारवृक्ष आरंभी व अंती खराेखर नाही. पण नवल असे की, ते नसून भासताे.
निळेपणा नसलेले आकाश निळसर दिसते ना? तसे याचे आहे. या प्रमाणे या संसारवृक्षाला आदि, अंत, स्थिती नाहीत. याला रूपही नाही. ताे आपल्या अज्ञानामुळे बळावला आहे. म्हणून या संसारवृक्षाचे अज्ञानरूपी मूळ यथार्थ ज्ञानाने ताेडून टाक. दाेरीला सर्प मानून काठ्या गाेळा करण्यात काय अर्थ आहे? मृगजळाची नदी तरून जाण्यास नाव कशासाठी हवी? आत्मज्ञानरूपी खड्ग आणि न खचणारे धैर्य असले म्हणजे याचे खरे रूप लक्षात येते. हे ज्ञानरूपी खड्ग पूर्ण बाेधाचा अनुभव देते. या खड्गाने आपल्यापुढे काही घाव मारण्यासाठी आहे, असे वाटतच नाही. चांदण्यात मृगजळ दिसत नाही. तसा हा संसारवृक्ष भासणार नाही.आत्मज्ञानरूपी खड्गाने वर मूळ असणारा हा संसारवृक्ष अर्जुना, तू छेदून टाक.