गीतेच्या गाभाऱ्यात

    27-Apr-2023
Total Views |
 
 
 

Bhagvatgita 
पत्र चाैदावे ‘‘जड आणि श्नती ह्यांचे विश्लेषण करता करता आम्ही ज्या अंतिम सत्याप्रत येऊन पाेचताे ते म्हणजे चैतन्य हाेय.’’ काॅम्पटन, मिलीकन, सर थाॅम्सन ह्याचे असे मत आहे की - ‘‘विश्व हा चैतन्याचाच आविष्कार आहे.’’ या चैतन्याचा शाेध घेणे हे तत्त्वज्ञानी माणसाचे मुख्य काम आहे. गीतेचे म्हणणे असे आहे कीईश्वर आपल्या हृदयात आहे.तू आपल्या अंत:करणाचा शाेध घे; माझी खात्री आहे की - बरीच खटपट केल्यानंतर तुला आपल्या अंत:करणातील ईश्वराचा साक्षात्कार हाेईल व तुला परमानंदाची अवस्था प्राप्त हाेईल.तुला वाटतं की- दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं.तू जरा सखाेल विचार कर, तुला कळून येईल की- मनुष्य हा असा चमत्कारिक प्राणी आहे की,- आपण जसं नाही तसं दिसावं आणि लाेकांनी फसावं अशी त्याची धडपड असते.
 
माणसाचं अंतरंग फार गहन गूढ आहे. या अंतरंगात दिव्यश्नती आहे, पण त्याचा साक्षात्कार हाेणं कठीण आहे.‘‘मी काेण हेच सर्वसाधारण माणसाला कळत नाही.’’ ‘‘मी काेण’’ हे ज्याला बराेबर कळलं ताेच खरा तत्त्वज्ञानी तू लिहितेस- ‘‘गीता सांगणारा कृष्ण किती उच्च, उदात्त, उत्तुंग आहे! त्याचे सारे जीवनच आदर्श आहे. पण लाेकनाट्याच्या गणगाैळणीत भगवान कृष्णाचे जे एखाद्या राेडसाईड राेमिओसारखे चित्र रेखाटले जाते ते किती हीन अभिरूचीचे असते!...केवळ गर्दी गाेळा करण्यासाठी कलेच्या क्षेत्रात ही जी हीन अभिरूचि आणली गेली आहे ती म्हणजे कलेचे कलेवर आहे...’’ तू म्हणतेस ते बराेबर आहे. याेगेश्वर कृष्ण असा खास नव्हता. या लाेकांना कृष्ण कळला नाही. काही गणगाैळणीत मात्र कृष्ण निराळा दाखवला आहे. आपण एकदा एक नामांकित लाेकनाट्य पाहणेस गेलाे हाेताे. त्यातील गण गणंगपणापासून अलिप्त हाेता व गाैळणींमध्ये अश्लीलता औषधालासुद्धा नव्हती.
 
कृष्णाने गाैळणीची मथुरेच्या बाजाराची वाट अडवली कशासाठी? कृष्ण म्हणाला - गाेकुळातले दही, दूध, लाेणी तिथल्याच लाेकांच्या मुखी पडले पाहिजे. अत्याचारी नि दुष्ट कंसाच्या मथुरेच्या बाजारात आपली ही अन्नसामग्री जाता कामा नये. त्या आक्रमक कंसाशी आपण पूर्ण असहकार केला पाहिजे...सद्विचारांची ती सुमने उधळणारा ताे वेग सुरू झाला आणि लाेक संतुष्ट झाले.कृष्णाच्या बाबतीत लाेकनाट्य असं काही आलं पाहिजे.माणसाची किंमत व गुण या बाबतीत तू जाे प्रश्न विचारला आहेस, त्याचे उत्तर असे कीप्रथम माणसाची किंमत त्याच्या पाेशाखावरून केली जाते पण नंतर माणसाची किंमत त्याच्या गुणांवरून केली जाते.तुला एक गाेष्ट सांगताे- फाट्नया कपड्यातला एक चित्रकार नेपाेलियनकडे गेला.नेपाेलियनने त्याला दूर बसण्यास सांगितले. नेपाेलियनने त्याची चित्रे पाहिली व मग जवळ बाेलावले. नेपाेलियनने त्याचा खूप आदर-सत्कार केला.