एका पाेलीस शिपायाने एका चाेराला माेठ्या शिताीने पकडले खरे; पण त्याला जेलमध्ये पाठविण्यासाठी बेड्या आणायचा वसरूनच गेला. शिपाई म्हणाला, ‘‘अरे! मी बेड्या आणायचे विसरलाे.’’ यावर चाेर म्हणाला, ‘‘काही टेन्शन घेऊ नका. मी आता बेड्या घेऊन येताे.’’ त्यावर शिपाई म्हणताे कसा, ‘‘अरे व्वा! तू मला मूर्ख समजताेस काय? तू इथेच थांब.मी घेऊन येताे बेड्या!’’ आता तुम्हीच सांगा काेण मूर्ख ठरला. शिपाई की चाेर? कधी कधी मनुष्य स्वत:ला खूपच शहाणा समजताे.