संसारवृक्षाचे सुरू असलेले वर्णन ज्ञानेश्वर आणखी पुढे करतात.समुद्र जसा कमी जास्त हाेत नाही, त्याप्रमाणे संसारवृक्ष अविनाशी असताे. ज्ञानी पुरुष दान करून पुण्य मिळवताे. त्याप्रमाणे संसारवृक्ष नाश पावून अविनाशी असताे. रथाचे चाकअतिवेगाने िफरत असता ते स्थिर वाटते. त्याप्रमाणे संसारवृक्षास काेट्यवधी अंकुर ुटूनही ताे जसाच्या तसा असताे. चतुर्दश भुवने, कल्प यांची पुनरावृत्ती हाेते.जगताचे अनेक समुदाय हाेतात.कांड्यामागून कांडे उत्पन्न हाेऊन जसा ऊस वाढताे तसा वंशविस्तार हाेताे. पण या वृक्षाच्या ांद्यांचा अंत समजत नाही. याचा देहरूपी शेंडा गळून पडताे आणि पुन्हा अंकुर ुटतात. जाेराने वाहणाऱ्या पाण्यात ज्याप्रमाणे मागचे पाणी मिळते, त्याप्रमाणे संसार अस्थिर असूनही लाेक त्याला स्थिर मानतात.
या संसारवृक्षाच्या अनेक शाखा वर जातात. त्याच्या मुळ्यांनाही खाली वेल व पाला ुटताे. स्वेदज, जारज, अंडज, उद्भिज अशी प्राणिसृष्टी उत्पन्न हाेते. एका मुळापासून चाैऱ्यांशी लक्ष अंकुर निर्माण हाेतात. या संसारवृक्षाचे अनेक प्रकारांनी वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. पशू, पक्षी, जनावरे, विंचू, साप असा याचा विस्तार हाेताे.गवत, लाेखंड, माती, दगड अशा जड याेनी निर्माण हाेतात. या वृक्षाला निरनिराळ्या शाखा ुटतात. धर्मरूपी शाखेला चंद्र, सूर्य, श्रेष्ठ ग्रह, पितर, ॠषी, विद्याधर अशा शाखा ुटतात.याही शाखांतून अनेक ॠषी निर्माण हाेतात. अर्जुना, या वरच्या शाखांनंतर या संसारवृक्षाला जी फळे येतात ती म्हणजे ब्रह्मदेव व शंकर यांचे अंकुरच हाेत.