माणसाची बाेटं पाहून त्याच्या चित्तात किती हिंसा आहे ते सांगता येतं.त्याच्या बाेटांची वळणं सांगतात किती हिंसा आत दडून राहिली आहे.कारण बाेटांना उगीचच वळणं मिळत नाहीत. तेव्हा बुद्धांच्या बाेटाची ठेवण वेगळी असेल. वेगळी असेलच. कारण आत काहीही हिंसा नाही. हात एखाद्या फुलासारखा उमलेल. बाेटांमध्ये काेणतेही कप्पे नाहीत. कारण त्यांच्यात काेणतंही पाॅकेट नाही. असेच अन् अगदी आपल्या संपूर्ण शरीरभर कप्पे भरलेले आहेत. जिथं बरंच काही एकत्र झालंय असे बरेच बिंदू आहेत.त्या बिंदूंवर जर बराेबर दाब देता येणं श्नय झालं, जर त्या बिंदूंना मु्नती देता आली तर वृत्तीत फरक पडेल.या देशात याेगासनं शाेधली गेली, बसण्याच्या विशेष पद्धती शाेधण्यात आल्या.
आपण जर बुद्ध, महावीरांच्या मूर्ती पाहिल्या असतील, बहुतेक सर्वांनीच पाहिल्या असतील. पण लक्षपूर्वक पाहिल्या नसतील. जे लाेक राेज महावीरांच्या मंदिरात जाऊन त्यांना नमस्कार करतात, त्यांनीसुद्धा लक्षपूर्वक त्या पाहिल्या नसतील. पण खरं रहस्य त्या मूर्तीच्या व्यवस्थेत दडून आहे. जर महावीरांची मूर्ती लक्षपूर्वक न्याहाळली तर त्यांचं संपूर्ण शरीर एक विद्युतवलय असल्यांचं आपल्या लक्षात येईल. दाेन्ही पाय जुळलेले, दाेन्ही पायांचे चवडे गुडघ्याजवळ जुळलेले दिसतील. विद्युतउत्सर्जनाचे जे बिंदू असतात ते नेहमी टाेकदार असतात. टाेकांतून विद्युत बाहेर पडत असते गाेल वस्तुंमधून ती कधी बाहेर पडत नसते. फ्नत टाेकदार वस्तुतून विद्युत बाहेर जाते.