बस्स दाेनच असे भाग आहेत. माणसाने हिंसेच्या अशा यु्नत्या शाेधून काढल्या आहेत की त्यामध्ये दातांचीही गरज नसते. अन् नखांचीही नसते. पण शरीराची जी यंत्रणा आहे ती तुम्ही सुरी कधी बनवलीत याचा काहीच पत्ता नाही.आपण दातांच्या ठिकाणी माणसाला मारण्यासाठी अगदी साेयीस्कर अशी हत्यारे बनवून टाकली आहेत, याचा शरीराला पत्ताही लागलेला नाही. शरीराची अंगे, र्नतपेशी इ.जुन्याच शैलीने काम करीत राहतात. जेव्हा तुम्ही हिंसेनं भरून जाता तेव्हा पहा आपल्या दातांमध्ये कम्पन सुरू हाेते. आपल्या दातांकडे खास वीज वाहायला लागते, दात-ओठ खाल्ले जातात, दात आवळले जातात.
आपण म्हणता की मी मग असा रागावलाे की अगदी दातओठ खाऊ लागलाे. दातओठ खाण्याचं रागाशी काय देणं-घेणं आहे? आपण दात-ओठ न खाता आरामात रागवा, दात-ओठ खाल्ल्याशिवाय जमायचं नाही. कारण दातांकडे विद्युत वाहणं चालू झालेलं असतं.पण सभ्य माणूस दातांचा उपयाेग करीत नसताे. कधी कधी असभ्य माणसं रागावली की चावून घेतात, पण सभ्य माणसं तसं काही करीत नाहीत. पण तुम्ही सभ्य झालात, हे दातांना माहिती नाही? तुम्ही चावत नाही तेव्हा दातांमध्ये उत्पन्न झालेली विद्युत जी चावण्यानं माेकळी हाेते, आता माेकळी हाेऊ शकणार नाही ती दातांच्या आसपास हिरड्यांमध्ये साचत राहते, त्या ऊर्जेचे तेथे कप्पेच तयार हाेतात.