चाणक्यनीती

    22-Apr-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : धनामुळे धर्माचे, याेगामुळे (अभ्यासामुळे) विद्येचे, दयाळू-क्षमाशील स्वभावामुळे राजाचे आणि सुशील स्त्रीमुळे घराचे रक्षण हाेते.
 
भावार्थ : कशामुळे कशाचे रक्षण हाेते हे इथे सांगितले आहे.
 
1. धर्म : मानवसमाजासाठी आवश्यक संस्थांपैकी एक संस्था आहे, ‘धर्मसंस्था’. ही संस्था उलथून पाडण्याचे प्रयत्नही मानवच करताे. धर्माच्या रक्षणासाठी धनाची आवश्यकता असते. धर्मग्रंथ, धर्माची शिकवण देण्यासाठी मठांची स्थापना, मंदिरांची उभारणी, गावाेगाव-देशाेदेशी भ्रमण यासाठी धन लागते. अन्यथा मठ, मंदिरे उद्ध्वस्त हाेतात.