गीतेच्या गाभाऱ्यात

    21-Apr-2023
Total Views |
 
 
पत्र तेरावे
 
Bhagvatgita
त्या दु:खामुळे ताे आपले कर्तव्यदेखील करत नाही.हे दाेन्ही अतिरेक वाईट आहेत. तू असे लक्षात घे कीसद्गुण म्हणजे अतिरेकांचा सुवर्णमध्य.लाेकमान्य टिळकांनी गीता आपल्या आचरणात आणली हाेती. दु:खाने खचू नये व सुखाने नाचू नये. हा गीतेचा संदेश त्यांच्या राेमराेमात भरला हाेता. पण, त्यांची बायकाे वारल्यावर जेव्हा मंडलेच्या तुरुंगात त्यांना तार मिळाली तेव्हा त्यांना फार दु:ख झाले. त्यांनी डाेळे पुसले. दु:ख आठवले व पुढच्या व्यवस्थेबद्दल जे कर्तव्य करायला पाहिजे हाेते त्याबद्दल पत्र पाठवले.प्रत्यक्ष रामचंद्राचे चरित्र पहा. रावणाने सीता पळवून नेल्यावर राम प्रत्येक झाडापुढे जाऊन रडू लागला. नंतर रामाने दु:ख आवरले, ताे नुसताच रडला असता तर रामाला काेणी राम म्हटले नसते. रामाने सीताशाेध सुरू केला व शाेध करून रावणाला ठार मारून सीतेला परत आणले.
 
सुट्टीत मी सांगलीस गेलाे असताना संध्याकाळी एक संन्यासी आमच्या घरी आले. ते मला म्हणाले - ‘‘तुमचा वाडा माेठा आहे. आजच्या रात्री मी तुमच्याकडे मु्नकाम करू का?’’ मी म्हटले ‘‘जरूर’’ ते संन्यासी आमच्या घरी राहिले. त्यांचा मी खूप आदरसत्कार केला. रात्री ते मला म्हणाले- ‘‘गीतेची शिकवणूक माझ्या जीवनात भिनून गेली आहे.मी इतका ज्ञानी झालाे आहे की माझ्याइतका ज्ञानी हिंदुस्थानात दुसरा काेणी नाही. साऱ्या उपनिषदांचा मी अभ्यास केला आहे. माझी खात्री आहे की मी सर्वांत माेठा ज्ञानी आहे.’’ ते संन्यासी खूप विद्वान हाेते, पण त्यांचा अहंकार पाहून मला वाईट वाटले. गीतेचा खरा भ्नत कदापि अहंकारी असत नाही. अहंकारनाश हा परमार्थाचा पाया आहे. हा पाया नसताना अध्यात्माची इमारत उभारली तर ती पडल्याशिवाय राहणार नाही.
 
ते संन्यासी पुढे मला म्हणाले, ‘‘गीता वाचून माझ्या मनाची इतकी तयारी झाली आहे की, प्रत्यक्ष माझी आई वारली, त्यावेळी माझ्या डाेळ्यांत टिपूसदेखील आले नाही. मला थाेडेसुद्धा दु:ख झाले नाही.तुम्हाला काय वाटते?’’ मी म्हटले- ‘‘तुमचे हे बाेलणे ऐकून मला वाईट वाटते. जगांत आईच्या प्रेमाची सर कशालाच नाही. आई वारल्यानंतर तुम्हाला दु:ख झाले असते, तर मला बरे वाटले असते.’’ ते संन्यासी म्हणाले- ‘‘तुम्ही अजून कच्चे आहात. मी मन ताब्यात ठेवण्याच्या बाबतीत फार वरच्या पायरीवर गेलाे असल्यामुळे आई मेल्यावर मला अजिबात दु:ख झाले नाही.’’ दुसरे दिवशी सकाळी शाैचाला जाण्यापूर्वी त्यांनी चहा मागितला. शाैचाला जाऊन आल्यावर पुन्हा चहा मागितला.त्यांना चहा दिला. अर्ध्या तासाने त्यांनी पुन्हा चहा मागितला.त्यांना चहा दिला. अर्ध्या तासाने ते जाण्यास निघाले, पण जाण्यापूर्वी मला म्हणाले-