जाले जन्माचे सार्थक । निर्गुण आत्मा आपण येक ।।1।।

    18-Apr-2023
Total Views |
 
 

saint 
 
श्रीदासबाेधातील सहाव्या दशकातील या दुसऱ्या समासाचे नाव ‘पावनब्रह्म निरुपण’ आहे. या समासात श्रीसमर्थांनी देह आणि मन याहून असलेले आत्म्याचे वेगळेपण आणि सृष्टीतील पंचमहाभूतांहून स्वतंत्र असलेल्या पवित्र अशा निर्गुण ब्रह्माचे स्वरूप विशद केले आहे. ब्रह्मज्ञानाशिवायच उपदेश म्हणजे कडबा कुटणे; लाेण्याच्या आशेने लाेणी काढलेले ताकच पुन्हा घुसळणे; उसाच्या रसहीन चाेयट्या चाेखणे किंवा खाेबरे साेडून करवंटी खाण्याप्रमाणे निष्फळ आणि व्यर्थ आहे. यासाठी शहाण्या माणसाने अन्य असार ज्ञान साेडून सारभूत अशा ब्रह्मज्ञानाचाच अभ्यास केला पाहिजे.सर्व सृष्टी ही पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून निर्माण हाेते; परंतु तीसुद्धा नाशवंत आहे. सृष्टीच्या पूर्वी आणि विनाशानंतरही अविनाशी आणि शाश्वत असे ब्रह्मच असते.
 
जे दृश्य जग आपल्याला दिसते, तेच आपण सत्य मानून चालताे, परंतु या सर्वांचा केव्हा ना केव्हा अंत किंवा विनाश हाेणारा असताे.
त्या दृश्याचे रूप आपण पाहताे. त्याला विविध नावे देताे; पण खरे ब्रह्मस्वरूप हे दृश्यापलीकडे अव्यक्त असे आहे. ते साध्या डाेळ्यांनी दिसू शकत नाही; पण असे अव्यक्त असूनही सर्व चराचर व्यापून असते आणि सूक्ष्मतेने जाणवू शकते.आपल्याला दिसणारेच सत्य मानण्याची सवय लागलेली आहे. ती साेडून त्रिकालाबाधित चिरंतन तत्त्वाचे गूढ जाणून घेतले पाहिजे आणि हे जाणण्याचा मार्ग अध्यात्मश्रवण हाच आहे. जाे दिसताे ताेच देव मानावयाचा असा सामान्य लाेकांचा भ्रम असताे व त्यामुळे जितकी गावे आहेत तेवढे गावगन्ना वेगवेगळे देव असतात;