तया वेगळाचि काय प्रकाशें । ज्ञानित्व यावें असे । कायि जळार्णव पाउसें । साजा हाेय ।। 14.333

    18-Apr-2023
Total Views |
 

Dyaneshwari 
 
देहाच्या विविध गुणांचे वर्णन ज्ञानेश्वर करीत आहेत. आणि ज्या श्रीकृष्णांच्या आधाराने ते हे निरूपण करतात त्यांच्या गर्जनेने माेराप्रमाणे अर्जुन अतिशय सुखावला. त्याने भगवंतांना प्रश्न विचारला, श्रीकृष्णा, तीन गुणांच्या पलीकडे काेण जाताे? त्याचे आचरण कसे असते? ताे काेणत्या लक्षणांनी ओळखावा? तीन गुणांच्या पलीकडे ताे जाताे तरी कसा? या गुणातील पुरुषाचे आचरण कसे असते? देवा, तुम्ही कृपेचे माहेर आहात. तुम्ही मला हे सर्व सांगावे. अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून कृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझा प्रश्न अपूर्व आहे. गुणातील कर्मे करणे व गुणांपासून तरून जाणे हे काय तुझे विचारणे? गुणातील पुरुष गुणांच्या कधीच स्वाधीन हाेत नाही. तुला संशय असेल तर तू प्रश्न खुशाल विचार. मी त्याचे स्पष्ट उत्तर देईन. पांडवा, रजाेगुणाचे कार्य प्रकाश.तमाेगुणाचे कार्य माेह.
 
यांची प्राप्ती झाली असता गुणातील त्यांची इच्छा करीत नाही आणि त्यांचा तिरस्कारही करीत नाही. गुणातील माणसाच्या अंगी कर्माभिमान नसताे किंवा कर्मे करण्याची राहिली याचा खेदही नसताे. ताे विद्वत्तेने हर्षभरित हाेत नाही आणि विद्वत्ता मिळाली नाही तर खेदही पावत नाही. तमाेगुण वाढला की, गुणातील पुरुष माेह व भ्रम यांनी ग्रासला तरी ताे कधी अज्ञानाचा स्वीकार करीत नाही.
त्याला ज्ञानाची इच्छा नसते. ज्ञान झाले तरी त्याला हर्ष हाेत नाही. त्याच्या हातून सहज कर्म हाेते. सूर्याला ज्याप्रमाणे प्रात:काल, माध्यान्हकाल सायंकाल इत्यादींची गणना नसते, याप्रमाणे गुणातीत पुरुष असताे. त्याला काही वेगळ्या प्रकाशाने ज्ञान मिळवावयाचे आहे काय? ताे ज्ञानाची मूर्तीच असताे. समुद्र हा पावसाने भरताे काय? हिमालय पर्वत कधी थंडीने थरथरेल काय? त्याप्रमाणे तमामुळे त्याच्यापुढे माेह जरी उभा राहिला तरी ताे ज्ञानाला मुकत नाही. उन्हाळ्याकडून अग्नी कधी जाळला जाईल काय ?