पत्र तेरावे
व ताे कज्जा माझ्यापुढे चालत हाेता.ज्या काेकणात पूर्वी फाैजदारी गुन्हे नव्हते त्यात काेकणात असला भयंकर खटला माझ्यापुढे आला. माझी खात्री झाली की - धार्मिक संस्कारांचा जाेर नाहीसा झाला म्हणजे महाभयंकर प्रकार हाेतात.सुधारणा दाेन पायांवर चालते. एका पायाचे नाव कायदा व दुसऱ्या पायाचे नाव धार्मिक संस्कार. हे दाेन्ही पाय धड असले म्हणजे सुधारणा चांगली चालू शकते.पक्ष्याला दाेन पंख असतात. दाेन पंखाशिवाय ताे आकाशात उडणार नाही. सुधारणादेखील कायदा व धार्मिक संस्कार या दाेन पंखांची आवश्यकता आहे. नुसत्या कायद्याच्या पंखाने सुधारणेला आकाशात उडता येणार नाही.तू म्हणतेस की - ‘‘आता मनुष्याने चंद्रावर पाय ठेवला. वैज्ञानिक सुधारणा खूप झाली.
असल्या अंतराळ शाेधामुळे मनुष्य सुखी हाेईल.’’ तू गीतेचा नीट अभ्यास कर. तुला कळून येईल की - अंतरंग न शाेधता नुसतंअंतराळ शाेधलं तर मनुष्य सुखी हाेणार नाही. अंतरंगाचा शाेध हा पाया आहे. या पायाशिवाय अंतराळशाेधाची इमारत उभारली तर ती केव्हा पडेल याचा नेम नाही.तू भजनाच्या ्नलासला जातेस व घरात दत्ताचे भजन रंगात येऊन म्हणतेस. तू असे लक्षात घे की - ज्ञान, कर्म व भ्नती ही दत्ताची तीन मुखे आहेत. सद्विचार व सदाचार हे दत्ताचे दाेन पाय आहेत आणि अनहंकार,अनास्नती, अनपेक्षता, समता, शुचिता व संतुष्टता हे दत्ताचे सहा हात आहेत.असा दत्त तू समजून घे म्हणजे तुला गीता समजेल.
ही पत्रे वाचून मला खूप पत्रे येत आहेत. कितीतरी लाेक मला भेटून चर्चा करतात. एकाने म्हटले आहे.ही पत्रे म्हणजे आम्हा दांपत्यांची मेजवानी आहे. या मेजवानीमुळे आमच्या जीवनाला पाैष्टिकपणा आला आहे.ही पत्रे आम्ही वाचताे व त्याबद्दल चर्चा करताे. या पत्रांच्या आरशातून आम्ही गीतेचे स्वरूप समजून घेत आहाेत. आपण खूप पत्रे लिहा व आम्हावर असेच उपकार करा. या पत्रांमुळे आमचे जीवन इष्ट त्या दिशेने जात आहे. ही पत्रे म्हणजे आमच्या जीवननाैकेचा सुकाणू आहे...’’ तू लिहितेस - ‘‘मनाचा समताेलपणा ही सुखाची गुरुकिल्ली आहे असे तुम्ही म्हणता. गीता वाचून मला ते पटते.
पण हे कठीण नाही का? कधी वाईट दिवस येतात, कधी चांगले दिवस येतात.अशा वेळी काय यु्नती करावी म्हणजे मनाचा समताेलपणा राहील?’’ मनाचा समताेलपणा राखणे हे कठीण आहे. त्या बाबतीत मनापासून प्रयाेग करीत असावे. तुला बादशहा अकबर माहीत आहे. त्याने हातात एक अंगठी घातली हाेती. त्या अंगठीवर खालील शब्द काेरलेले हाेते.ये दिन भी जाएंगे। वाईट दिवस आले म्हणजे ती अंगठी त्याला सांगावयाची - ये दिन भी जाएंगे.चांगले दिवस आले म्हणजे ती अंगठी त्याला सांगावयाची - ये दिन भी जाएंगे।