ओशाे - गीता-दर्शन

    17-Apr-2023
Total Views |
 
 
 

Osho 
म्हणजे ज्या विद्युतवाहक नसतात, त्या साऱ्यांची ध्यानात मदत हाेते. पण याची वैज्ञानिक कारणे आज स्पष्ट हाेऊ शकली आहेत. आज विज्ञान म्हणतं की, विद्युत-वाहक वस्तूंवर बसून ध्यान करणे म्हणजे धाेका विकत घेणेच हाेय. का? कारण जेव्हा आपण गहन ध्यानात लीन हाेता तेव्हा आपलं शरीर एका अगदी आगळ्याच प्रकारे, एकदम वेगळ्याच प्रकारची अंतर्विद्युत निर्माण करतं, इनर इले्निट्रसिटी निर्माण करतं.जेव्हा आपण पूर्णतः ध्यानात असता तेव्हा आपल्या शरीराची बाॅडी इले्निट्रसिटी, शारीरिक विद्युत सक्रिय हाेते.अन् प्रत्येकाच्या शरीरात विद्युत ऊर्जेचं एक माेठं भांडार असतं. हाेय आपणा सर्वांच्याच शरीरात ऊर्जेचं भांडार आहे. त्याच विजेवर आपण चालताे, उठताे, बसताे.
 
हा जाे श्वास आपण घेत आहात ताे केवळ तुमच्या शरीरातील विद्युताला प्राणवायूचा पुरवठा करून त्याला जिवंत ठेवताे. ताे दुसरं तिसरं काहीही करत नसताे, फ्नत ऑ्निसडायझेशन करताे. तुमच्या शरीरातील विद्युत सतत चालू ठेवण्यासाठी ऑ्निसजनची गरज असते. म्हणून श्वासाशिवाय तुम्हाला जगता येणार नाही. आणि शरीर एक जनरेटर म्हणजे विद्युतजनित्र आहे असंच म्हणा ना. त्यात सतत विद्युत निर्माण हाेत असते.ध्यानाच्या वेळेला या विद्युत्-ऊर्जेला संरक्षण मिळते, काॅन्झर्वेशन हाेते.साधारणतः या ऊर्जेला आपण फेकून देत असता. मी जरा हात हलवला तरीही विद्युत ऊर्जा थाेड्याप्रमाणात मी या क्रियेद्वारे बाहेरफेकली.मी एक शब्द बाेललाे तर या शब्दाला बाहेर फेकण्यासाठी माझ्या शरीरातला ऊर्जेचा एक भाग संपुष्टात आला.