सत्त्व, रज, तम या तीन गुणांचे वर्णन केल्यावर या गुणांच्याही पलीकडे जाणाऱ्या ज्ञानी माणसाच्या अवस्थेचे विवेचन ज्ञानेश्वरमहाराज करतात. सत्त्व, रज, तम हे तीन गुण जन्ममृत्यू, जरा व्याधी या तीन अवस्था यांतून मुक्त हाेऊन मनुष्य निर्गुणावस्थेकडे जाताे. हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी एक मार्मिक दृष्टांत दिला आहे. पाेपट जसा पिंजऱ्यातील दांडीवरून उठून माेकळा हाेऊन बाहेर झाडाच्या ांदीवर जाऊन बसताे. त्याप्रमाणे हा ज्ञानी मनुष्य देहाची अहंता साेडून माझ्यास्वरूपी येऊन मिळताे.भेदाच्या प्रतीतीचा आरसा त्याच्या हातून ुटल्यामुळे बिंब आणि प्रतिबिंब या भावास ताे मुकला.त्याला देहाचा अहंकार उरला नाही. लाटांचे ऐक्य जसे समुद्राशी हाेते त्याप्रमाणे जीवाचे व शिवाचे हाेते.
पावसाळा संपल्यावर ढग आकाशरूप हाेतात. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य ईश्वररूप झाल्यावर ताे देहाच्या, गुणांच्या तावडीत सापडत नाही.कंदिलाभाेवती अभ्रक जरी बांधला तरी त्याचा प्रकाश कमी हाेत नाही. समुद्रातील अग्नी कधी विझत नाही.त्याप्रमाणे तीन गुणांच्या येण्याजाण्यामुळे त्याचा बाेध कधी कमी हाेत नाही.अशा माणसाच्या देहाचे काय वर्णन करावे? अंगावरील कात टाकून बिळात प्रवेश केलेल्या सर्पाचे काेणी वर्णन करावे? कमळाचा सुवास परत कमळाकडे काेणी न्यावा? अशा प्रकारे देहाचे धर्म व गुण ज्ञानी मनुष्य जाणत नाही. जन्म, म्हातारपण, मरण ताे आत्मस्वरूप झाल्यामुळे त्याला सारखेच वाटतात. घट ुटल्यावर त्यातील आकाश आकाशरूप हाेते. त्याप्रमाणे हा ज्ञानी मनुष्य देहधारी असला तरी गुणातीत हाेऊन परमात्मामय बनताे.