आपल्या मागून इतरांना ‘नेणारा ताे नेता.’ असा नेता एखादाच असताे. बाकीचे सर्व त्याच्यामागे जातात.त्यातून लढाईत तर प्राणाशी गाठ असते. अशावेळी सामर्थ्य, धैर्य खचू न देणे अत्यंत गरजेचे असते.सेनापती पुढे राहून सैन्याला सूचना देत लढत असताे. वीर सेनाही सूचनांनी उत्तेजित हाेऊन लढत असते. पुढे नेणारा सेनापतीच जर युद्धादरम्यान घाबरला तर सैन्य हवालदिल हाेऊन माघार घेते आणि काेणी मारल्यास प्रतिवारही करत नाही. सर्व सेनाच हतबल हाेते किंवा तिचा विनाश हाेताे.