गीतेच्या गाभाऱ्यात

    17-Apr-2023
Total Views |


पत्र तेरावे

Bhagvatgita
एकदा आम्ही पाच-सहा लाेक सायकलीवरून झाेपड्यांकडे निघालाे. बरेच लांब गेल्यावर थांबलाे. जेथे थांबलाे त्या रस्त्यापासून झाेपड्या बऱ्याच आत हाेत्या. लाेक म्हणाले - ‘‘आपण येथेच रस्त्यावर सायकली टाकू व चालत झाेपड्यांकडे जाऊ संध्याकाळी परत आल्यावर सायकली घेऊन परत चिपळूणला जाऊ.’’ मी म्हटले - ‘‘अहाे! आमच्या सांगली गावात सायकली चाेरीला जातात. अन् तुम्ही तर म्हणता येथेच रस्त्यावर सायकली टाकून रानात झाेपड्यांकडे जायचे!’’ ते लाेक म्हणाले - ‘‘हे काेकण आहे. येथे धार्मिक संस्कारांचा फार जाेर आहे. काेकणात चाेरी नाही. आम्ही दारे उघडी टाकून झाेपी गेलाे तरी चाेरी हाेत नाही.’’ त्यावेळी मला असेही कळले की - काेकणात फाैजदारी काेर्टाना विशेष काम नाही.एक वकील मला म्हणाले - ‘‘सातारा जिल्ह्यात खूप खून हाेतात पण रत्नागिरी जिल्ह्यात खून नाहीत.

येथे धार्मिक संस्कारांचे प्राबल्य असल्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण अत्यल्प आहे.’’ मी नुसते ऐकत हाेताे.आम्ही सायकली रस्त्यावर टाकून रानात झाेपड्यांकडे गेलाे. धाकधूक वाटत हाेती की - आमच्या सायकली चाेरीस जाणार.संध्याकाळी आम्ही परत आल्यावर मी पाहिले की - आमच्या सायकली रस्त्यावर हाेत्या तश्शाच आहेत! ते पाहून मी अगदी चाट झालाे! नंतर 1956 साली मी रत्नागिरीला डिस्ट्र्निट व सेशन्स जज्ज म्हणून गेलाे. त्या वेळी काेकणात धार्मिक संस्कारांचा लाेप झाला हाेता. कायदा हाेता पण धार्मिकसंस्कारांचा जाेर नाहीसा झाला हाेता.माझ्यापुढे पहिलाच जाे सेशन्स कज्जा आला हाेता ताे खुनाचा हाेता.एक तरुण खाेत रात्री आठ साडेआठ वाजता जेवण्यास बसला हाेता. कुळ कायद्यामुळे वैमनस्य निर्माण झाले हाेते.रात्री काही लाेक खाेताच्या दारात आले व त्यांनी गुळपाणी मागितले. ताे खाेत पानावरून उठला व गुळपाणी घेऊन बाहेर आला. त्या लाेकांनी त्या खाेताला सुऱ्याने ठार मारले.

त्या खाेताची बायकाे ओरडू लागली. त्या लाेकांनी तिलाही सुऱ्याने ठार मारले. मरणाेत्तर रिपाेर्टात असे दिसून आले की, त्या बाईच्या अंगावर एक नाही दाेन नाही तर सुऱ्याचे बत्तीस वार हाेते!! त्या तरुण खाेताची आई बाहेर आली; तिलाही त्या दुष्टांनी ठार मारले.घरात खाेताचा नाेकर हाेता. त्यालाही त्या लाेकांनी सुऱ्यांनी ठार मारले. त्या तरुण खाेताची छाेटी मुलगी रडू लागली. तिलाही त्या नराधमांनी सुऱ्यांनी ठार मारले!!! डाेळ्यांत जास्तीत जास्त पाणी येण्याचा प्रसंग म्हणजे त्या खाेताचा सहा महिन्यांचा मुलगा पाळण्यात झाेपला हाेता.त्यालाही त्या नीचांनी ठार मारले!!! त्या कज्ज्याचे नावच सहा खून कज्जा असे हाेत