जमिनीच्या पातळीखाली उतरून ध्यान करण्याची रीत आहे.पण जेव्हा कुणी एखादा श्रेष्ठतम पर्वत शिखरावर ध्यान करायला समर्थ हाेताे, तेव्हाच त्याला अशा रीतीने ध्यान करण्याची अनुज्ञा दिली जाते, असे का? तर ही अनुज्ञा तेव्हाच दिली जाते जेव्हा ती व्यक्ती अशा अवस्थेत पाेहाेचते जिथे तिच्या भाेवती सर्व प्रकारचे तरंग हजर असले तरी ती व्य्नती तरंगांपासून अप्रभावित राहू शकत असेल.... तरच ताे खड्ड्यात बसून साधना करण्यास समर्थ असताे.कृष्णाने अर्जुनाला म्हटले आहे की, जाे फार उंच नसेल, चढ उताराचं नसेल, आडवं-तिडवं नसेल असं आसन तू निवड. त्या आसनात तुला सहज शांत हाेणं साेपं जाईल.मृगाजिनाबद्दल सांगितले आहे त्याचीही कारणे आहेत.
अन् ती कारणे अशी आहेत की, जी आज जास्त स्पष्ट हाेऊ शकली आहेत. ती इतकी स्पष्ट कृष्णाच्या काळी पण नव्हती. तशी प्रचिती हाेती. प्रचिति अशी हाेती की काहीतरी फरक पडताे, पण ताे फरक काेणत्या कारणांनी पडताे त्या वैज्ञानिक स्थितीचा काही स्पष्ट बाेध त्याकाळी झालेला नव्हता.या देशात संन्यासी हजाराेच काय, लाखाे वर्षांपासून लाकडी खडावांचा उपयाेग करीत आला आहे, ते काही अकारण नाही.मृगाजिनांचा उपयाेग करीत आला आहे. तेही अकारण नाही. सिंहचर्माचा उपयाेग करीत आला आहे. ते अकारण नाही. लाकडी चाैरंगांवर बसून ध्यान करीत आला आहे, ते अकारण नाही.यामुळे काही फरक पडताे अशा प्रचिती यायला सुरुवात झालेली हाेती. ज्या वस्तू विद्युत-राेधक, ‘नाॅन कंड्निटव्ह’ असतात