आपली पात्रता जसजशी वाढते तसतसे श्रेष्ठतर तरंग पेलण्याचे सामर्थ्यही मिळत जाते.आपलं किती सामर्थ्य आहे? आपण जिथं जगताे, तीच पातळी सध्या आपण पेलू शकताे अशी आहे. जिथं बसून आपण दुकान चालवता, जेवण करता, गप्पागाेष्टी करता, जिथं जगता, झगडता, प्रेम करता, तीच आपल्या जीवनाची पातळी आहे. त्याच पातळीपासून सुरू करणं याेग्य आहे. फार खाली नकाे अन् फार वर नकाे.आपण जिथं आहात तिथंच आपलं ट्यूनिंग आहे. आत्ता आपण तिथूनच सुरुवात केलेली बरी. आणि जसजशी आपली क्षमता वाढेल तसतशी आपली उच्च पातळीची यात्रा श्नय आहे... आणि जसजशी आपली क्षमता वाढेल तसतसे आपण खड्ड्यात बसूनही ध्यान करू शकाल. क्षमता वाढली तर वर जाऊ शकाल, पर्वत-माथ्याची यात्रादेखील करू शकाल.
जुनी तीर्थे याच हिशेबाने बनवली गेली हाेती की जे श्रेष्ठतम तीर्थ असेल ते सगळ्याच्या वर असेल. आणि साधकाने हळूहळू यात्रा करत रहावे, शेवटची यात्रा कैलासाची. तिथं जाऊन त्याने समाधीत लीन व्हावं. तिथं शुद्धतम तरंग त्याला मिळत राहतील. पण त्याची क्षमताही सतत वाढत गेली पाहिजे. म्हणजे शुद्ध तरंग झेलायला ताे समर्थ हाेऊ शकेल. नाहीतर शुद्धतमाला झेलणे हेही उत्पाताचं कारण हाेऊ शकतं.आपली जितकी पात्रता नाही त्याहून जास्त आपणावर येऊन आदळलं तर त्यानं हानीच हाेते, लाभ नाही हाेत.सुफी फकिरांची खड्ड्यात जाऊन ध्यान करण्याची रीत आहे, वि