ऐसें लेंकरूं एक । प्रसवली हे देख । जयाचें तीन्ही लाेक । बाळसें गा।। 14.106

    14-Apr-2023
Total Views |
 
 
 
Dyaneshwari
 
एका ब्रह्मतत्त्वापासून सर्व विश्वाचा पसारा कसा झाला याचे विवरण ज्ञानेश्वरमहाराज गीतेच्या आधाराने येथे सांगत आहेत. या परमात्म्याची अविद्या नावाची विवाहित स्त्री आहे. ती तरुण आहे, गुणवान आहे, पण तिचे अस्तित्व सांगता येण्यासारखे नाही. परमात्मा झाेपलेला असताना ती जागी असते, सर्व ब्रह्मांडे पाेटात घालून ती गराेदर हाेते. आठ विकारांनी युक्त अशा जगद्रूपी गर्भाची वाढ करते. ईश्वराच्या व मायेच्या संगात प्रथम रजाेगुणी बुद्धितत्त्व तयार हाेते. यालाच मन असे नाव आहे. या मनाची तरुण स्त्री ममता असून ती अहंकाराला जन्म देते. ज्याप्रमाणे बीजाचा दाणा पाण्यास भेटल्यावर त्यामध्ये सूक्ष्म वृक्षाचा आकार तयार हाेताे, त्याप्रमाणे ईश्वराच्या संगाने अविद्येला अनेक अंकुर ुटतात. तेव्हअंडज, स्वदेज, उद्भिज व जारज असे जीव तयार हाेतात.
 
सत्त्व, रज, तम या गुणांची निर्मिती हाेते. पंचमहाभूते, मन व बुद्धी यांची निर्मिती हाेते.या जगद्रूपी बालकाचे चार हात व पाय असून महाप्रकृती हे त्याचे मस्तक आहे. प्रवृत्ती हे त्याचे पाेट आहे.निवृत्ती पाठ आहे. आनंदमय स्वर्ग हा त्याचा कंठ आहे.मृत्यूलाेक ही त्यांची कंबर आहे. पाताळ हा त्याचा पृष्ठभाग आहे. तीन लाेक म्हणजे त्याचे बाळसे आहे. असे हे विलक्षण मूल या प्रकृतीच्यामुळे जन्मास आले आहे. चाैऱ्यांशी लक्ष याेनी म्हणजे याचे सांधे आहेत. हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या अंगावर विविध अलंकार घातले जातात. माेहरूपी दूध पाजून माया याला नित्य नवे रूप प्राप्त करून देते. ब्रह्मदेव या बालकाचा प्रात:काल आहे. विष्णू हा माध्यानकाळ आहे. सदाशिव हा संध्याकाळ आहे. हे बालक खेळून आले म्हणजे महाप्रलयरूप शेजेवर झाेपते.