गीतेच्या गाभाऱ्यात

    14-Apr-2023
Total Views |
 
 

Bhagvatgita 
पत्र बारावे महात्मा गांधी म्हणत असत की - ‘‘गीता पेचप्रसंगाचा काेश आहे. माझ्या जीवनात जेव्हा जेव्हा पेचप्रसंग उत्पन्न झाला तेव्हा गीतेने ताे पेच साेडविला.गीतेला मी जास्तीत जास्त मान देताे.’’ या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल लागण्याकरता स्वकर्म म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.गीतेत म्हटले आहे- य: शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत:। न स सिद्धिमवाप्नाेति न सुखं न परां गतिम्।। तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थिताै। जाे शास्त्राला न विचारता मनाला वाटेल तसे वागताे त्याला सिद्धी मिळत नाही. सुख मिळत नाही व उत्तम गतीही मिळत नाही. म्हणून कर्तव्य काेणते व अकर्तव्य काेणते त्याचा निर्णय करताना तुला शास्त्र प्रमाण मानले पाहिजे.गीतेत पुढे असेही म्हटले आहे की - स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नाेति किल्बिषम्। स्वभावसिद्ध कर्म करत असता माणसाला पाप लागत नाही.
 
सखाेल अभ्यास केला म्हणजे असे म्हणता येईल कीस्वकर्म म्हणजे जे (1) शास्त्राला अनुसरून आहे व जे (2) आपल्या स्वभावाला अनुसरून आहे.आपल्या स्वभावाला अनुसरून आहे पण शास्त्राला अनुसरून नाही असे कर्म स्वकर्म ठरणार नाही.त्याचप्रमाणे शास्त्राला अनुसरून आहे पण आपल्या स्वभावाला अनुसरून नाही असे कर्म देखील स्वकर्म ठरणार नाही.तेच कर्म स्वकर्म हाेईल की, जे शास्त्राला अनुसरून आहे व आपल्या स्वभावाला देखील अनुसरून आहे.एकनाथ महाराज नदीवर स्नान करून आल्यावर एक दुष्ट मनुष्य त्यांच्या अंगावर थुंकला. हा खराेखर अन्याय हाेता.अशा वेळी शास्त्र म्हणते कीजाे अन्याय करील त्याचा प्रतिकार करण्यास हरकत नाही.शास्त्र असेही म्हणते की, प्रतिकार न करता आल्यास अन्याय करणाऱ्या माणसाचे हृदयपरिवर्तन करण्याकरता आत्म्नलेशाचा मार्ग अनुसरण्यास हरकत नाही.
 
एकनाथ महाराजांचा स्वभाव असा हाेता की, त्यांना आत्म्नलेशाचा मार्ग बरा वाटला. त्या दुष्ट मनुष्याला काही न बाेलता त्यांनी पुन्हा नदीत जाऊन स्नान केले.स्नान करून परत आल्यावर ताे दुष्ट मनुष्य पुन्हा थुंकला.एकनाथ महाराज काही न बाेलता परत स्नानास गेले. स्नान झाल्यावर ताे दुष्ट मनुष्य पुन्हा थुंकला.असा प्रकार बऱ्याच वेळा झाला. पण शांतिब्रह्म एकनाथ महाराज कमालीचे शांत राहिले.हा प्रकार पाहून ताे दुष्ट मनुष्य लाजला. त्याने एकनाथ महाराजांना नमास्कार केला.परेदशाहून हिंदुस्थानाला एक जहाज येत हाेते. डेकवर एक प्रीस्ट (धर्माेपदेशक) हाेता व एक हिंदू संन्यासी हाेता.ताे प्रीस्ट हिंदू धर्माला वाटेल त्या शिव्या देऊ लागला. हिंदू संन्यासी म्हणाला- ‘‘ज्याप्रमाणे साऱ्या नद्या समुद्राला मिळतात त्याप्रमाणे सारे धर्म परमेश्वराला मिळतात.