ओशाे - गीता-दर्शन

    13-Apr-2023
Total Views |
 
 

Osho 
जेव्हा ताे माईक बराेबर मला समांतर असेल, आवाजाच्या लहरींच्या समांतर असेल तेव्हाच माईक माझ्या ध्वनिलहरी नीट ग्रहण करू शकेल. माईक माझ्या ओठांच्या जितका समांतर असेल तितका माझा ध्वनी पकडणं साेपं जाईल.अगणित प्रकारचे तरंग नेहमीच या साऱ्या पृथ्वीवर सतत वाहत असतात. चहूकडे अगणित तरंग पसरत असतात. हे तरंग निरनिराळ्या प्रभारांचे असतात. अन् माेठी आश्चर्याची गाेष्ट ही की एखादा विचार जितका वाईट तितके त्याचे तरंग प्रभारी, वजनाने जड असतात, विचार जितका शुभ तितके ते तरंग हलके, निर्भार.आपण जर एखाद्या खड्ड्यात बसून ध्यान केलं, विहिरीत बसून ध्यान केलं, तर या पृथ्वीवर उमटणारे निम्नतम तरंग आहेत, वाईट विचारांचे आहेत फ्नत त्यांच्याच संपर्कात आपण याल. ते तरंग विहिरीत, खड्ड्यात पट्कन उतरतात.
 
श्रेष्ठ तरंग वरच्या पातळीतूनच वाहत राहतात. म्हणून लाेकांनी डाेंगराची यात्रा केली. डाेंगर-पर्वताच्या यात्रेचं कारण हाेतं यात्रा हाेती उंचीसाठी आणि उंची वाढली की तरंग बदलले, तरंगांचा दर्जा बदलला. तरंग आपापल्या विशिष्ट स्थितीतच राहतात. प्रत्येक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे तरंग प्रवास करीत आहेत. आणि एक प्रकारचा तरंग एकाच पातळीवर यात्रा करताे. म्हणून खड्ड्याला विराेध करण्यात आलेला आहे.मग आपण विचाराल, खड्डा नकाे म्हटले, पण मग उंचीवरील जागा ध्यानासाठी नसावी असे का म्हटले आहे? उलट आपण जित्नया जास्त उंचीवर जाऊ तितके श्रेष्ठतर तरंग मिळतील. तर तेही लक्षांत घ्या.उच्च पातळीवर श्रेष्ठ तरंग तर निश्चितच मिळतील. पण जर आपली पात्रता नसेल तर ते श्रेष्ठतर तरंगही आपल्या अंतरात उत्पात घडवून आणतील.