हसा! गुलाब चाेहाेबाजूंनी काट्यांच्या कचाट्यात सापडलेले असतानासुद्धा हसणं साेडत नाही. तुम्हीही प्रतिकूल परिस्थितीत हसलात, तर लाेक तुमच्यावर गुलाबाप्रमाणे प्रेम करतील. लक्षात घ्या-जिवंत मनुष्यच हसू शकताे. मृत्यू पावलेला नाही.हसणे हे केवळ मनुष्याच्या नशिबी आहे.जीवनात सुख आलं तर हसावे आणि दु:ख आलं तरी हसून त्याकडे कानाडाेळा करावा. तुम्हाला हसताना पाहून चार लाेक हसतील; पण तुम्हाला रडताना पाहून कुणीही रडणार नाही.