अर्जुनाला उपदेश करताना देव किती आनंदित झाले. तृप्त झाले याचे वर्णन संजयने धृतराष्ट्रापुढे केले.या अध्यायाचा समाराेप करताना ज्ञानेश्वर म्हणतात की, विशाल बुद्धी असणाऱ्या व्यासांनी महाभारतातील भीष्मपर्वात शांतरसाने भरलेली ही कथा सांगितली. हाच श्रीकृष्णअर्जुनाचा संवाद मी ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी आणखी स्पष्ट करीन.शांतरसाची ही कथा शृंगाराच्या मस्तकावर पाय ठेवणारी हाेईल. म्हणजे शृंगाररस या ठिकाणी दूर सरेल. अशा रीतीने ही देशी भाषा साहित्याला नटवील.अमृताला आपल्या गाेडपणाने मागे सारील. अशी ही अपूर्व सुंदर मराठी भाषा मी उपयाेगात आणीन. शांत रसाचे शब्द हे येथे महत्त्वाचे राहतील. शीतलतेच्याबाबतीत ते चंद्रावर ताण करतील.
माझे शब्द आपल्या रसरंगाच्या माेहाने नादब्रह्मास िफके पाडतील. पिशाच्चादी ज्या याेनी आहेत त्यांनाही माझे हे शब्द ऐकून सत्त्वगुणाचा पान्हा ुटेल. आणि शुद्ध अंत:करणाच्या लाेकांना तर माझे शब्द ऐकून समाधीच लागेल. याप्रमाणे अर्जुना, माझ्या वाणीच्या विलासाचा विस्तार मी करीन. गीतार्थाने सर्व विश्व भरवून टाकी. सर्व जगाला आनंदाचे भाेजन देईन.तत्त्वचर्चेचा धाक कमी हाेईल. कानाचे, मनाचे सार्थक हाेईल. वाटेल त्याला ब्रह्मविद्येची ही खाण पाहता येईल.हे परब्रह्म सर्वांना डाेळ्यांनी दिसाे. सुखाचा उत्सव हाेवाे.निवृत्तिनाथांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे मी हे सर्व कार्य आत्ताच करीन. मर्म स्पष्ट करण्यासाठी उपमा, काव्य, दृष्टांत, यांची रेलचेल करून प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट करीन. या श्राेत्यांच्या सहाय्यामुळे गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे.