ओशाे - गीता-दर्शन

    11-Apr-2023
Total Views |
 

Osho 
 
दुसरा वर असं नसेल, आपणाला शरीर झुकवून वा ताणून बसावं लागणार नसेल, तर ते उपयाेगी आहे. याचं खास वैज्ञानिक कारण आहे. पृथ्वी चाेवीस तास प्रत्येक क्षणी गुरूत्वाकर्षणाने आपल्या शरीराला प्रभावित करत असते.एखादा क्षण ती ओढत नाही, असं चुकूनही हाेत नाही. जेव्हा शरीर बिलकुल समताेल असतं तेव्हा ही ओढ, गुरूत्वाकर्षणाची खेच किमान म्हणजे कमीतकमी असते. जेव्हा तुम्ही थाेडेतरी तिरपे असता, तेव्हा गुरूत्वाकर्षणाची ओढ जास्त हाेते. कारण गुरूत्वाकर्षण व शरीर यांचा संबंध वाढताे.जर मी एकदम सरळ आसनात बसलाे तर गुरुत्वाकर्षण सरळ रेषेत फ्नत पाठीच्या कण्याला प्रभावित करतं. मी थाेडासा जरी वाकलाे तर मी जेवढं वाकलाे असेन तेवढ्या भागावर काेन करून गुरूत्वाकर्षण शरीराला प्रभावित करते.
 
म्हणून तिरपे उभे राहिल्यास तुम्ही लवकर थकून जाल.सरळ बसलात तर कमी थकाल. तिरपे बसला तर लवकर थकाल, जमीन जास्त ओढेल.म्हणून झाेपलात, बिछान्यावर पडलात की तुम्हाला विश्रांती मिळून जाते, कारण झाेपण्यात तुम्ही थाेडेही तिरपे नसता. त्या स्थितीत जमिनीचं गुरुत्वाकर्षण तुमच्या शरीरावर सगळीकडे सारख्या प्रमाणात असतं.कृष्णाच्या या व्नतव्याचा आधार, ‘जमिनीचं समान गुरुत्वाकर्षण’ हा आहे.कृष्णाला गुरुत्वाकर्षणाची काही माहिती असेल असे नाही, तशी काही गरजही नाही.न्यूटनने काही गुरुत्वाकर्षण निर्माण केलेलं नाही.ताे नव्हता तेव्हाही गुरुत्वाकर्षण हाेतंचं. फ्नत गुरुत्वाकर्षण हा शब्द आपल्याजवळ नव्हता.पण जमीन खेचते, चाेवीस तास प्रत्येक क्षणाला खेचतच राहते, एवढं ठाऊक हाेतं.