स्वार्थ सांडून प्रपंचाचा । हव्यास धरिला परमार्थाचा ।।1।।

    01-Apr-2023
Total Views |
 
 
 

saint 
माेठेमाेठे सम्राटही गेले, त्यामानाने आपल्या वैभवाचा काळापुढे काय पाड लागणार, हे ज्ञानाच्या प्रकाशामुळे समजून ज्याला विरक्ती येऊन पुण्यमार्ग आणि सत्संगतीची इच्छा उत्पन्न हाेते ताे मुमुक्षू हाेय.अशा वेळी त्याला वैराग्याच्या प्रभावामुळे स्वत:चेच अवगुण कळून येतात आणि ताे स्वत:लाच तटस्थपणे पाहून स्वत:चीच निंदा करू लागताे. या आत्मप्रत्ययामुळे त्याला आपले विविध दाेष व दुर्वर्तने आठवू लागतात. असे सांगून श्रीसमर्थ अशा आत्मपरीक्षणाचेवेळी मुमुक्षूला स्वत:बद्दल काय वाटते ते स्पष्ट करून सांगतात. असा मुमुक्षू म्हणताे की, मी अनाचारी, अनाेपकारी, दंभधारी, दुराचारी आणि पापी आहे. तापट, व्यसनी, दुराभिमानी, आळशी, अंगचाेर आणि अविचारी असल्यामुळेच मी असा वागत गेलाे.माझ्या अंगी सद्बुद्धीऐवजी कुबुद्धी व सदाचरणाऐवजी दुर्वर्तन वसत गेले.
 
भक्ती व उपासना मी कधीही केली नाही. देव, धर्म, संत, साधू, सज्जन यांचे अस्तित्व आहे हे सुद्धा कधी जाणले नाही.मी ताेंडाळ, वाचाळ, कुटिल आणि कपटी राहिलाे. पूजा, नामस्मरण, जप-तप, तीर्थाटन या कशातही अर्थ नाही. कारण परमार्थ आणि परमेश्वर हे अस्तित्वातच नाही असे समजून वागत राहिलाे. अशा वागण्याने मी माझे आतापर्यंतचे आयुष्य तर ुकटच घालवले आणि केवळ भूमीला भार म्हणून राहिलाे. अशा तऱ्हेने ताे स्वत:ची कुलक्षणे आठवून स्वत:चीच निंदा करीत राहताे हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतातम्हणे मी काहींच नेणे । म्हणे मी सकळाहूनि उणे । आपली वर्णी कुलक्षणे । या नाव मुमुक्षू ।।33।। आपले दाेष आपल्याला दिसणे ही सुधारणेची प्रक्रिया सुरू झाल्याचीच खूण आह