बेडूक सापचिया ताेंडी । जातसे सबुडबुडीं । ताे मक्षिकांचिया काेडी । स्मरेना कांही ।। 13.731

    01-Apr-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
अज्ञानी मनुष्य विषयसुखात किती रमून गेलेला असताे, याचे वर्णन आणखी ज्ञानेश्वर पुढे करतात. देह हाच आत्मा आहे, अशी त्याची समजूत असते.पूर्ण झालेल्या कर्माने ताे ुगताे व अपूर्ण राहिलेल्या कर्माची त्याला खंत वाटते. मंत्र-तंत्र करण्यात त्याला आनंद वाटताे. विद्येने व तारुण्याने मस्त हाेऊन ताे छाती काढून चालताे. ताे असे म्हणताे की, या जगात मीच एक महत्त्वाचा मनुष्यआहे.माझ्याकडेच सर्व संपत्ती आहे. माझ्याशिवाय काेणी माेठा नाही, मीच प्रसिद्ध आहे, असा गर्व त्याला झालेला असताे.ताे लाेकांचे कधी बरे सहन करत नाही. दिवा वात खाताे, तेल जाळून टाकताे व जेथे ठेवावा, तेथे काजळाचे काळे दिसते. त्याप्रमाणे त्याचे वागणे असते. पाणी शपडल्यावर दिवा तडतड करताे. वारा लागला, तर विझून जाताे आणि एखाद्या ठिकाणी स्पर्श झाला, तर सर्व जाळून काडी उरू देत नाही. अज्ञानी माणसाचे असेच असते.
 
नवज्वर झालेल्या माणसास दूध औषध म्हणून दिले तरी ताे वाढताे. सर्पाला दूध पाजले, तर त्याचे विष हाेते.त्याप्रमाणे चांगल्या गुणांचा ताे मत्सर करताे. विद्वत्तेचा त्याला अहंकार असताे. ज्ञानाचा त्याला गर्व वाटताे. अजगराने खांबाचे लाकूड गिळावे, त्याप्रमाणे ताे अभिमानाने ुगताे.लाटण्यासारखा ताे ताठ असताे. दगडाला जसा पाझर ुटत नाही किंवा ुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही, त्याप्रमाणे ताे काेणाच्याच ताब्यात राहत नाही. अर्जुना, याप्रमाणे अज्ञानच वाढत्या प्रमाणात दिसते. हाकललेले कुत्रे जसे परत घरात येते, तसे ताे विषयांकडे धावताे. बेडूक सापाच्या ताेंडात सर्व गेलेला असताना ताे बेडूक आपल्या जिभेने कीटक गिळत असताे आणि आपले मरण आले आहे, हे ध्यानात घेत नाही, अज्ञानी असाच असताे.