2. प्रत्यक्ष संकट : जसे की, वाघाला भ्यावे; त्याच्या (गुहेत) समाेर जाऊ नये. ताे समाेर येईल याची चिंताही करत बसू नाही; पण जर ‘वाघ’ समाेर आलाच तर भय त्यागून साऱ्या शक्तीनिशी त्याच्यावर तुटून पडावे, निकराची झुंज द्यावी. स्वत: प्रयत्न करावे.कुणीतरी मदतीला धावून येईल, या अपेक्षेने नुसतेच बसू नये.
बाेध : संकटाने (भयाने) आपल्याला पछाडण्याऐवजी आपली शक्ती शाबूत ठेवून वेळ आलीच, तर प्राणपणाने लढावे. निर्भयता आणि सतर्कता महत्त्वाची असते. चांगल्याची अपेक्षा करावीच; पण वाईटाचीही अशावेळी तयारी ठेवावी.