गीतेच्या गाभाऱ्यात

    01-Apr-2023
Total Views |
 
 

Bhagvatgita 
पत्र दहावे रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत प्रस्थापित केले. त्यांच्या मते ब्रह्म ही वस्तू सत्य व नित्य आहेच परंतु जीव व जगत या वस्तूदेखील नित्य असल्या तरी त्या स्वतंत्र नाहीत. ब्रह्मातच जीव व जगत ह्या ब्रह्मस्वरूपात कारणरूपाने असतात आणि या कार्यरूपाने परिणाम पावतात.वल्लभाचार्यांनी शुद्धाद्वत प्रस्थापित केले.वल्लभाचार्यांच्या मते श्री शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे जीव, ब्रह्म एकच नसून अग्नीच्या ठिणग्यांप्रमाणे जीव हे ईश्वराचे अंश आहेत. मायात्मक जगत मिथ्या नसून माया ही परमेश्वराच्या इच्छेने परमेश्वरापासून विभ्नत झालेली श्नती आहे.मध्वाचार्यांनी जीव, जगत व ब्रह्म या 3 स्वतंत्र वस्तू मानलेल्या आहेत. या तिन्ही वस्तू सत्य व नित्य असून परस्परांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. शंकराचार्यांचा विवर्तवाद अथवा मायावाद आणि रामानुजाचार्यांचा परिणाम वाद त्यांना मान्य नाही.महानुभाव तत्वज्ञानात चार वस्तू नित्य मानलेल्या आहेत.
 
(1) जीव (2) देवता (3) प्रपंच (4) परमेश्वर. प्रपंच हा जड आहे. परमेश्वर हा नित्यमु्नत आहे. देवता नित्यबद्ध आहेत आणि जीव बद्धमु्नत आहे. प्रपंच जड असल्यामुळे त्याचा मु्नतीचा प्रश्न नाही. देवता नित्यबद्ध असल्यामुळे त्यांना मु्नती नाही. जीव अविद्येने बद्ध असला तरी मु्नत हाेण्याची पात्रता असल्यामुळे ताे बद्ध मु्नत आहे.‘‘सर्व खलु इदं ब्रह्म’’ या अद्धैत तत्त्वाप्रमाणे जगात नित्य वस्तू एकच आहे, आणि ती म्हणजे ब्रह्म अथवा परमेश्वर.महानुभव तत्त्वाप्रमाणे जीव परमेश्वराहून भिन्न असला पाहिजे.परिपूर्ण ईश्वराच्या ठिकाणी माया निर्माण झाली, असे म्हणणे म्हणजे आनंदातून दु:ख जन्माला आले किंवा अमृतातून विष उत्पन्न झाले, अथवा प्रकाशातून अंधार निर्माण झाला, असे मानण्यासारखे आहे, असे महानुभव तत्त्वज्ञानाला वाटते. या तत्त्वज्ञानाचे असे म्हणणे आहे की काेळिष्टकांनी आकाश व्यापले जाणे, हे जसे अश्नय आहे, त्याप्रमाणे परिपूर्ण ब्रह्माला मायेने व्यापणे अश्नय आहे.विवर्तवाद्यांचे असे म्हणणे आहे की, प्रपंच म्हणजे परमेश्वरावर झालेला भास हाेय.
 
दाेरीवर ज्याप्रमाणे सर्पाचा भास हाेताे किंवा शिंपल्यावर ज्याप्रमाणे रजताचा भास हाेताे, अथवा वाळवंटावर ज्याप्रमाणे मृगजळाचा भास हाेताे, त्याप्रमाणे परब्रह्मावर प्रपंचाचा भास हाेताे. प्रपंच हा मुळातच खाेटा व मिथ्या आहे. हे तत्त्वज्ञान महानुभव तत्त्वज्ञानाला मान्य नाही. त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रपंच स्वतंत्र वस्तू आहे.तुला तत्त्वज्ञान जाणून घेण्याची फारच इच्छा झाली आहे.तुझी उत्सुकता भागविण्याच्या दृष्टीने तू आणखी असे लक्षात घे की, आपल्याकडे चार्वाक मुनींनी असा सिद्धांत केला आहे की, या जगात ईश्वर नाहीच.स्वर्ग, परलाेक वगैरे कल्पना झूट आहेत. पूर्वजन्म व पुनर्जन्म वगैरे खाेट्या कल्पना आहेत. दृष्टीला दिसणारा व अनुभवाला येणारा भूमी, जल, अनल व अनिल यांचा जड प्रपंच एवढीच काय ती सत्य वस्तू हाेय, पण ती देखील नित्य नाही. मृत्यूबराेबरच जीवाचा शेवट असल्यामुळे मृत्यूनंतर हा देह पुन्हा परत येत नाही, म्हणून जिवंत असेपर्यंत कर्ज काढा, तूप प्या सुखाने जगा.
अलीकडे डाॅ. जाेडचे तत्त्वज्ञान फार लाेकप्रिय झाले हाेते. त्याने पुष्कळ ग्रंथ लिहून असे दाखवून दिले की, या जगांत देव नाही.