मी आहे म्हणून हे आहेत, मी जर नसलाे तर हे मरतीलच, अशी अहंकाराची भाषा वापरणाऱ्या माणसाला अहंकारातून बाहेर काढण्यासाठी महाराजांनी उपराेक्त दृष्टांताची आठवण दिली आहे.खरेच आहे, पृथ्वीच्या पाेटात खाेदले असता बऱ्याच वेळा माती, दगडातून जिवंत बेडूक बाहेर पडताे. एखादा माेठा दगड, गाेटा फाेडला तर त्यातून टणकन उडी मारून बेडूक बाहेर येताे.या बेडकाला काेणी चारापाणी दिले, याचा विचार करू गेल्यास निश्चितच आपण नाही, हे त्याचे उत्तर असेल. याचाच अर्थ असा आहे की, मी केले, मी करताे म्हणूनच हे हाेते किंवा हे आहे, असे म्हणून अहंकारात बरबटण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेले कर्म फलेच्छारहित हाेऊन करणेच याेग्य.
आपल्या करण्याने थाेडे फार कांही हाेतही असेल, पण, याचा अर्थ असा नाही की आपण केले नाही, तर कांहीच हाेणार नाही किंवा जगाचे व्यवहार चालणारच नाहीत.काेट्यवधी लाेक जन्माला आले आणि मेले तरी जगाचा व्यवहार चालूच आहे. यावरून आपण आपल्या मर्यादा ओळखून वागले, तर आपल्या सुखात निश्चित वाढ हाेईल, असे आम्हास वाटते.
जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448