शेजार धर्माचे पालन करा. शेजारधर्म म्हणजे तरी काय? हाच की, तुम्ही अवश्य जेवा; परंतु आपला शेजारी तर उपाशी नाही ना, ही गाेष्ट ही ध्यानात घ्या. चांगला शेजारी मिळणे म्हणजे चांगला आशीर्वाद मिळण्यासारखे हाेय. शेजाऱ्याशी भांडू नका. कारण आपण मित्रांशिवाय जगू शकताे, पण शेजाऱ्यांशिवाय नाही. त्यांच्या सुखदु:खात सामील व्हा. लक्षात ठेवा, आज तर तुम्ही शेजारच्या घरात मीठ पाठवत असाल, तर उद्या तुमच्या घरात शेजारच्या घरातून नक्कीच मिठाई येईल.