ओशाे - गीता-दर्शन

    09-Mar-2023
Total Views |
 
 

Osho 
 
मद्य कित्येक प्रकारांचं असतं. अर्जुनाला पण मद्य पाजता आलं असतं, मग ताे सगळं विसरून नशेमध्ये युद्ध खेळला असता.मद्य कित्येक प्रकारचं असतं कुलाभिमानाचं, यशाचं, धनाचं, राज्याचं, प्रतिष्ठेचं, अहंकाराचं यातलं कुठलंही मद्य त्याला पाजता आलं असतं.मग ताे एकूण एक विसरून, वेडा हाेऊन तुटून पडला असता. त्याच्या अंतरीच्या जखमा छेडता आल्या असत्या. कृष्ण त्याच्या जखमेला स्पर्श करू शकत हाेता की, ‘तुझ्या द्राैपदीशी दुर्याेधनाने काय व्यवहार केला, ताे माहितीय का ? मग लगेच नशा चढायला लागली असती. त्याच्या जखमांची खपली सहज काढता आली असती.जखमा खाेल हाेत्या.
 
ताज्या हाेत्या. कृष्णाला हे करणं काही अवघड गेलं नसतं. मग एवढी लांबलचक गीता सांगण्याची काही गरजही पडली नसती. थाेडासा डंख पुरेसा हाेता, की त्याच्यात विष भिनलं असतं. फ्नत इतकंच म्हणायचं हाेतं कृष्णानं ‘अर्जुना, तुला आठवताे ताे क्षण ! द्राैपदीला दुर्याेधनानं नागवलं, आपली उघडी मांडी दाखवून म्हटलं, ये, बैस इथं, त्यावेळी तू मान खाली घालून बसला हाेतास आणि तुझ्यासमाेरच ताे तिला असं शड्डू मारीत म्हणाला हाेता. ताे क्षण लक्षात आहे?’ बस्स, एवढंच पुरेसं हाेतं.गीता सांगायची काहीएक गरज नव्हती. अर्जुन चवताळून युद्धास सिद्ध झाला असता. पण तसं काहीएक कृष्णाने केलं नाही.