गीतेच्या गाभाऱ्यात

    09-Mar-2023
Total Views |
 
 
पत्र सातवे
 

Bhagvatgita 
ज्ञानी माणसाला पुष्कळदा अहंकार येताे. भ्नितप्रेम अंगी बाणले म्हणजे मात्र अहंकार निघून जाताे. म्हणूनच असे वाटू लागते की, प्रेमाशिवाय ज्ञान व्यर्थ आहे.माझ्या लहानपणची एक नितांत मार्मिक गाेष्ट आहे.सांगलीला मुरलीधराच्या देवळात एक विद्वान शास्त्री राेज सकाळी गीतेवर प्रवचन देत असत शास्त्रीबुवा पराकाष्ठेचे ज्ञानी हाेते. सारे शांकरभाष्य त्यांना मुखाेद्गत हाेते. त्यांचे प्रवचन ऐकताना असे वाटायचे की, ज्ञान त्यांच्या घरी पाणी भरते आहे.त्याचवेळी सांगलीला ह. भ. प. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर आले हाेते. त्यांचे नगर वाचनालयाच्या पटांगणात संध्याकाळच्या सुमारास व्याख्यान ठरले हाेते.शास्त्रीबुवांचे सकाळी प्रवचन झाल्यावर काही लाेक त्यांना म्हणाले की, आपण आज संध्याकाळी पांगारकरांच्या व्याख्यानाला जाऊ.
 
त्या दिवशी त्या लाेकांच्या बराेबर शास्त्रीबुवा व्याख्यानाला गेले. पांगारकरांचे व्याख्यान सर्वाेंत्कृष्ट झाले. भ्नितप्रेमाने न्हाऊन निघालेले पांगारकर इतके रसाळ बाेलले की लाेक अगदी संतुष्ट झाले.दुसरे दिवशी सकाळी शास्त्रीबुवा आपल्या प्रवचनात म्हणाले, ‘‘काल मी संध्याकाळी पांगारकरांच्या व्याख्यानाला गेलाे, पण खरे सांगायचे म्हणजे माझा ताे तास फुकट गेला. उगीच मी गेलाे असे मला वाटू लागले.’’ शास्त्रीबुवांचे म्हणणे लाेकांना आवडले नाही. एक श्राेता लगेच उभा राहीला आणि म्हणाला, ‘‘कालचे पांगारकरांचे व्याख्यान सर्वाेत्कृष्ट झाले असताना आपण असे कसे म्हणता?’’ लगेच शास्त्रीबुवा संतापून म्हणाले, ‘‘खाली बसा, तुम्हाला काहीच कळत नाही. मी इतका ज्ञानी आहे की, माझा हात धरणारा काेणी नाही.
 
प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आता या ठिकाणी आला आणि त्याने मला विचारले की, तुला काय शंका आहे, तर मी सांगेन की, मला काही शंका नाही, तू आलास तसा चालता हाे.’’ हा प्रकार माझ्या हृदयाला जाऊन भिडला. माझी खात्री झाली की, भ्नितप्रेमाशिवाय ज्ञानाला काही अर्थ नाही.भ्नितप्रेम नसेल तर ज्ञानी मनुष्य पराकाष्ठेचा अहंकारी बनताे.म्हणूनच मला वाटते की, एकनाथ महाराजांनी देवाजवळ मागणे मागताना म्हटले की- ‘‘भ्नितप्रेमाविण ज्ञान नकाे देवा’’ असाे.बाकीचा मजकूर पुढील पत्री.तुझा राम पत्र आठवे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. पत्र वाचून फार आनंद झाला.तू गीताधर्माची दीक्षा घेतलीस हे पाहून माझी श्रद्धा अनेक पटीने वाढली आहे. गीताधर्मावर श्रद्धा ठेवणारा एक माणूस वाढला म्हणजे मला पुत्रजन्माचा आनंद हाेताे.या बाबतीत मला महंमद पैगंबरांची आठवण हाेते. त्यांच्या बायकाेने जेव्हा त्यांच्या धर्माची दीक्षा घेतली तेव्हा त्यांची स्वत:ची श्रद्धा खूप पटीने वाढली व ते म्हणाले,