3. भांडखाेर पत्नी - रागीट, शिवीगाळ करणारी पत्नी आपल्या पतीला कधीच सुखाने जगू देणार नाही. तिच्या रागाची शिकार बनण्यापेक्षा तिचा त्याग केलेला केव्हाही चांगला.
4. स्नेहहीन नातेवाईक - माता - पिता, भाऊ-बहीण इतर नातेवाइकांची माया जर ‘काेरडी’ असेल तर अशा नातेवाइकांशी संबंध ताेडून टाकावेत. कारण ते आपल्यावर खरे प्रेम करत नसतील, तर त्यांच्याकडून आपल्याला फक्त मनस्तापच मिळेल. अडी-अडचणीला ते कधीच धावून येणार नाहीत, की कधी दुखऱ्या मनावर ुंकर घालणार नाहीत.
बाेध : ज्या गाेष्टींमधून शांती, शिक्षा, सुख, समाधान, आनंद, प्रेम मिळण्याऐवजी आपल्याला केवळ त्रासच हाेत असेल, तर त्या सर्व गाेष्टींचा त्याग करणेच हितावह असते.