पत्र सातवे
किंमत कळते. म्हणून ते वरचे दु:खाचे कवच फाेडतात व आतील सुखाचा उपभाेग घेतात.काही लाेकांना अशी शंका आहे की, ‘‘आधी अनुभव मग नाद’’ असा नियम आहे. सिगरेटचा नाद लागण्यापूर्वी आधी सिगरेट ओढावी लागते. चहाचा नाद लागण्यापूर्वी ताे प्यावा लागताे. सिगरेट व चहाचा अनुभव घेतल्याशिवाय त्याबद्दल नाद लागत नाही. आधी अनुभव मग नाद असा नियम असताना देवाचा जर आपणास काहीच अनुभव नाही तर देवाचा नाद कसा लागेल? अशा परिस्थितीत ‘‘देवाचा नाद’’ हा शब्दप्रयाेग बराेबर वाटत नाही. या शंकेबद्दल तू असा विचार कर की, मनुष्य वयात आल्यावर त्याला विषयसुखाचा नाद लागताे.विषयसुखाचा अनुभव नसतानादेखील त्याला विषयसुखाचा नाद लागताे. त्याला असे वाटू लागते की आपण विषयसुखाचा अनुभव घेतला पाहिजे. त्याशिवाय जीवनाचे सार्थक नाही.
ताे त्यासाठी तळमळताे. त्याला चैन पडत नाही. त्याच्या मनात विषयसुखाचे विचार चाललेले असतात. विषयसुखाचा अनुभव घेण्यापूर्वीच ताे त्या नादात असताे.देवाचे असेच आहे. पारमार्थिक दृष्ट्या मनुष्य वयात आला की त्याला देवाचे नाद लागताे. देवाचा अनुभव घेण्यापूर्वीच त्याला देवाचा नाद लागताे. त्याला वाटू लागते कीआपण देवाचा अनुभव घेतला पाहिजे. त्याशिवाय जीवनाचे सार्थक नाही ताे त्यासाठी तळमळताे. त्याला चैन पडत नाही. त्याच्या मनात देवाचे विचार चाललेले असतात.देवाचा अनुभव घेण्यापूर्वीव ताे त्या नादात असताे.तुझा पुढचा प्रश्न असा आहे की, एखाद्या मनुष्याला खूप सुखे मिळत असतात. लाेकांनी हेवा करावा इतकी सुखे त्याला मिळत असतात. असे असून देखील त्या मनुष्याच्या बाबतीत सुखाचा पूर्णांक का हाेत नाही? याचे उत्तर असे आहे की, सुखाचा उपभाेग अंशस्थानी असताे आणि सुखाची अपेक्षा छेदस्थानी असते.
सुखाचा उपभाेग सुखाची अपेक्षा यामध्ये सुखाची अपेक्षा सुखाच्या उपभाेगापेक्षा माेठी असल्यामुळे अथवा अंशापेक्षा छेद माेठा असल्यामुळे गणितात ताे अपूर्णांकच राहणार.साधुसंतांना सुखाची अपेक्षा कमी असल्यामुळे व आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सुखे देवाने दिली आहेत, अशी त्यांची भावना असल्यामुळे त्यांच्या बाबतीत पूर्णांक हाेणे श्नय असते. संपत्ती आणि विपत्ती या बाबतीत तुझा जाे प्रश्न आहे, त्याचे थाेड्नयात उत्तर असे की, अंतरंगातील दिव्य श्नतीची स्मृती हीच खरी संपत्ती आणि अंतरंगातील दिव्य श्नतीची विस्मृती हीच खरी विपत्ती! तुझ्या पुढील प्रश्नाचे उत्तर असे की, ‘‘आपल्या अंगावर पाणी पडल्यावर ज्याप्रमाणे कबुतर पंखांनी पाणी उडवून लावते त्याप्रमाणे दु:खाचे पाणी तत्त्वज्ञानाच्या पंखांनी उडवून लावावे.’’ तू आपल्या डायरीत टिपून ठेव की, ‘‘जाेपर्यंत अहंकार आहे, ताेपर्यंत तत्त्वज्ञान अंगी बाणत नाही.’’