मग आपल्या लक्षात येईल की परमात्म्याचा काही हिशेब असेल, ताे माझ्याकडूनही काम करवून घेताेय, अन् माझ्या शत्रूकडूनही काम करवून घेताेय. त्याचे अनंत हात आहेत, लाखाे प्रकार आहेत त्याचे काम करवून घेण्याचे. मग आपणाला शत्रू-मित्र वगैरे बनवण्याची काही गरज पडणार नाही. पण याचा असा अर्थ नाहीये की आपल्याला काेणी शत्रू असणार नाही वा काेणी मित्र असणार नाही. ते बनतील ती त्यांची मर्जी. ते बनवण्याची आपणाला काही गरज पडणार नाही. आणि आपण दाेघांमध्ये समभाव ठेवू शकाल.
ही समता आली तरी मनुष्य याेगात प्रतिष्ठित हाेऊन जाताे. कुठून का हाेईना समत्व यावं, तेच सार आहे.
म्हणून कृष्ण या सूत्रात, ‘शत्रू-मित्र यामध्ये थांबायला सांगत आहे.’ अर्जुनाला या सूत्राची मात्रा चांगलीच लागू पडू शकते. गीतेत त्याची सगळी अडचण वाटतेय. ज्यांना मारावं लागणार असे बरेच मित्र तिकडे आहेत. निव्वळ शत्रू असते, त्यांना मारायचं असतं तर त्यात काहीएक अडचण नाहीये. अर्जुनाला तशी काहीएक अडचण नाही. जर विभागणी सरळ सरळ असती तर मग सगळंच अगदी साेपं हाेतं. पण विभागणी माेठी विचित्र हाेती. हे युद्धच मुळी आगळं हाेतं. आणि म्हणून तर या युद्धाच्या मंथनातून गीतेचा जन्म झाला. नाही तर गीता निर्माणच झाली नसती. ते युद्ध यामुळं आगळं हाेतं की विरुद्ध बाजूलासुद्धा मित्रच उभे हाेते. काेणी सगे-साेयरे, संबंधी हाेते.
प्रियजन, नात्यातली माणसं हाेती.