4. वयाेवृद्धासाठी तरुणी - पुरुषाला स्त्रीविषयी नैसर्गिक आकर्षण असते; परंतु पुरुष वयाेवृद्ध झाल्यानंतर ताे तेजाेहीन, शक्तिहीन बनताे.याही अवस्थेत स्त्रीचे आकर्षण कायम असते, त्यातूनही स्त्री तरुण असेल, तर ताे आणखीच माेहित हाेताे; त्याला त्याचा त्रासही तेवढाच हाेताे. त्याच्यासाठी तरुणी दु:खदायक असते. पूर्वी एखाद्या आजाराने किंवा प्रसूतीच्या वेळी स्त्री मरण पावत असे. अशावेळी पुरुष दुसरे, तिसरे लग्न करत असे. अगदी पंचाहत्तर वर्षांचा म्हातारा व साेळा वर्षांची तरुणी असेही विवाह हाेत. प्रभातच्या ‘कुंकू’ या सिनेमात आणि ‘शारदा’ या नाटकात ही समस्या मांडली आहे. ‘लग्ना अजूनी लहान, अवघे पाऊणशे वयमान।’ हे गाणेही जुन्या व्यक्तींना माहीत असेल.
बाेध : प्रत्येक गाेष्टीची एक याेग्य वेळ असते. प्रत्येक गाेष्ट त्या-त्या वेळेत व्हायला हवी. वेळ गेल्यानंतर त्या गाेष्टीला महत्त्व उरत नाही. किंबहुना; आनंद देणाऱ्या गाेष्टीच दु:खदायक ठरतात.