गीतेच्या गाभाऱ्यात

    04-Mar-2023
Total Views |
 
 

Bhagvatgita 
 
पत्र सातवे ज्याप्रमाणे लाेकमान्य म्हटल्यावर टिळकांचे नाव आपल्या लक्षात येते किंवा ज्याप्रमाणे छत्रपती म्हटल्यावर शिवाजी महाराजांचे नाव लक्षात येते, अथवा महात्मा म्हटल्यावर गांधीचे नाव लक्षात येते, त्याचप्रमाणे गीता म्हटल्यावर भगवद्गीतेचे नाव आपल्या लक्षात येते.तुझा दुसरा प्रश्न असा की, ध्यानाच्या बाबतीत काेणता क्रम पाहिजे? पुष्कळ लाेकांची समजूत आहे की, आधी देवाचे ध्यान करायचे, मग देवाबद्दल काही ऐकायचे अन् मग देवाचे दर्शन घ्यावयाचे. हा क्रम बराेबर नाही. अन्तरंगात अगाेदर देव पहावा मग त्याबद्दल ऐकावयाचे, नंतर त्याचे मनन करायचे अन् मग त्याचे ध्यान करायचे. उपनिषदांतील प्रख्यात मंत्र तुला माहिती असेल ताे असा की, ‘‘आत्मा वा अरे द्रष्टव्य:, श्राेतव्य:, मन्तव्य:, निदिध्यासितव्य:’’ ह्यांत जाे क्रम आहे ताे असा की, प्रथम दर्शन, नंतर श्रवण, नंतर मनन व मग ध्यान.
 
तुला गीतेमध्ये फार गाेडी उत्पन्न झाली हे साेन्याहून पिवळे झाले. तुझ्या पुढील प्रश्नाचे उत्तर असे की, लाेक चांगल्या गाेष्टींची न्नकल करण्याऐवजी वाईट गाेष्टीची न्नकल करतात.तुला माहीत असेल की, लाे. टिळक गेल्यानंतर कितीतरी लाेक त्यांची न्नकल करू लागले. काहीनी त्यांच्याप्रमाणे पायात जाेडा घातला. काही लाेक त्यांच्याप्रमाणे बाराबंदी घालू लागले आणि खूप लाेक लाे. टिळक सुपारी खात हाेते म्हणून सुपारी खाऊ लागले. हे प्रकार पाहून कै. तात्यासाहेब केळकर म्हणाले, ‘‘लाेकांनी लाेकमान्यांचा कित्ता घेण्याऐवजी अडकित्ताघेतला.’’ गीता आपणास असे सांगते की, आपल्या जीवनात ज्ञान, कर्म, भ्नती यांचा समन्वय पाहिजे, व समन्वय करताना आपण जास्तीत जास्त जाेर भ्नतीवर दिला पाहिजे तू असे लक्षात घे की, भ्नतीमध्ये जास्तीत जास्त आनंद साठविलेला असताे.
 
जाेपर्यंत भ्नतीचा आनंद कळला नाही ताेपर्यंत बाकीचे आनंद बरे वाटतात; पण जेव्हा भ्नतीचा आनंद कळताे, तेव्हा बाकीचे आनंद मिळमिळीत वाटतात. अश्वत्थाम्याला लहानपणी त्याची आई दूध म्हणून पाण्यात कालविलेले पीठ द्यावयाची आणि अश्वत्थाम्याला त्यात आनंद वाटायचा; पण जेव्हा ताे खरे दूध प्याला तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीय हाेता. मग त्याला कालविलेल्या पिठात विशेष रस वाटेना! गीता वाचून माणसाने देवाची अनन्य भ्नती करावी. महाभारत वाचून तुला कळून आले असेल की, शेवटी धर्मराजाबराेबर कुत्रा स्वर्गात गेला. अनन्य सेवा करणारा ताे कुत्रा भीष्मार्जुनापेक्षादेखील श्रेष्ठ ठरला.
 
तू विचारतेस की माणसाचे आयुष्य किती वर्षे कल्पिले आहे? साधारणत: असे म्हणण्यात येते की, माणसाने 100 वर्षे जगावे. असेही सांगण्यात येते की, वेदाच्या दृष्टीने 100 वर्षे म्हणजे 120 वर्षे! छांदाेग्य उपनिषदामध्ये जाे काळ दिला आहे ताे 116 वर्षांचा आहे. त्यात असे म्हटले आहे की- ‘‘पुरुषाे वाव यज्ञस्तस्य यानि चतुर्विंशतिवर्षाणि तत् प्रात: सवनम्। अथ यानि चतुष्चत्त्वारिंशद्वर्षाणि तत् माध्यंदिन सवनम्। अथान्यान्यष्टाचत्त्वारिंशद्वर्षाणि तत् तृतीय सवनम्।’’ पुरुष हा एक यज्ञ आहे. पहिली 24 वर्षे म्हणजे प्रात:काळ! पुढील 44 वर्षे म्हणजे मध्यान्हकाळ आणि पुढील 47 वर्षे म्हणजे सायंकाळ!