अन् जिथे दुसऱ्याची काहीही रूप-रेखा राहत नाही तेथे ‘स्वतःचीही’ रूप-रेखा उरण्याचं काही कारण उरत नाही.सारं निराकार हाेऊन जातं.त्या निराकार क्षणांमध्ये ईश्वराचं ध्यान केलं जातं, त्याला जाणलं जातं, ताे जगला जाताे. ताे काही परिचय नाही की, मग आपण पृथक हाेऊन त्याला पाहत नाही.त्याच्याशी एकरूप हाेऊन त्याला जाणताे.स्वतंत्रपणे, दुरून, बाहेरून ओळखणे असा त्या जाणण्याचा प्रकार नाहीये. ते एकरूप हाेऊनच जाणणं आहे. आपण ताेच हाेऊन त्याला जाणताे.आणि जेव्हा काेणी अंतर्गुहेत पाेहाेचताे तेव्हा ताे स्वतःच भगवंत, भगवान हाेऊन जाताे.भगवंत हाेण्याचा अर्थ एवढाच की, तिथे त्याच्यात आणि भगवंतामध्ये काहीच अंतर राहत नसते आणि भगवंत हाेणं हेच प्रत्येक व्य्नतीचं ध्येय आहे. त्यापूर्वीच्या काेणत्याही टप्प्याला अंतिम ध्येय समजू नका. निराकार हाेण्याआधी काेठेही थांबू नका, ती सर्व विश्राम ठिकाणे आहेत.जिथं स्वतःसुद्धा संपून जाईल. सर्व संपून जाईल. फ्नत शून्य, निराकार उरेल-केवळ तिथंच थांबायचं आहे. परम आनंद ताेच आहे.त्या परम आनंदाच्या दिशेनेच कृष्ण अर्जुंनाला या सूत्राद्वारे इशारा करीत आहे.