वाच्यार्थ : संकटांची (ज्यांना आपण भिताे त्यांची) भीती असावी; पण ते येईपर्यंतच. प्रत्यक्ष संकट आलेच तर मात्र न भिता आत्मविश्वासाने त्यांचा सामना करावा.
भावार्थ : ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात, ते खरेच आहे.
1. भय: व्यक्ती अनेक गाेष्टींना घाबरते. जसे की, (लहान मुले भुताला, बागुलबुवाला, तर माेठी माणसे वाघ, साप इ.ना) एखाद्या गाेष्टीची मनात जेवढी भीती तेवढी ती गाेष्ट तिचे ‘भय’, आपल्या मनात घर करून राहते. ‘अंतर्मनात’ ठाण मांडून बसलेले हे भय कधी-कधी (सत्यात नाही तर) स्वप्नातही अवतरते. घामाघूम हाेत व्यक्ती झाेपेतून उठून बसते. नेहमी धास्तावलेली राहते. चित्त शांत राहू शकत नाही; पण भीतीला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व न देता त्या भीतीचा मनावर हावी हाेऊ देऊ नये.