पितृ देवाे भव। वडील देव आहेत. आईची माया धरणी-मातेपेक्षाही भारी आहे आणि वडिलांचे स्थान आभाळीपेक्षाही उंच आहे. जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही; परंतु एक वडील असे आहेत जे आपल्या मुलाला आपल्या-पेक्षाही पुढे गेलेला पाहून आनंदी हाेतात. देशाच्या तरुणांनाे ! तुमच्या पाकिटात पैशांऐवजी वडिलांचा ाेटाे ठेवा.कारण त्या ाेटाेतल्या मनुष्यानेच तर तुमचे नशीब सुधरवले आहे. झाड भले जुने हाेऊ दे, अंगणातच राहू द्या. फळ नाही तर नाही, पण सावली तर देईलच देईल.