अशा बद्ध माणसाकडे काेणतेही ज्ञान नसते हे स्पष्ट केल्यानंतर त्याच्याकडे काेणते गुण (?) असतात ते पाहावयास गेले, तर काम, क्राेध, मद, लाेभ, माेह, दंभ, मत्सर अशांनी ताे भरलेला असताे. सगळे सुख मलाच मि ळावे, असे त्याला वाटत असल्याने दुसऱ्याचे सुख, पैसे ओरबाडून घेण्याकडे त्याचे लक्ष असते. इतरांचा मत्सर, हेवा, तिरस्कार यांनी ताे त्यांचा द्वेष करीत असताे.त्यांच्याकडील धन मला कसे मिळेल, याची त्याला हाव असते. त्यासाठी वाटेल ते अनाचार व अत्याचार करण्यासही ताे मागेपुढे पाहात नाही. कृतघ्न, निष्ठुर, स्वार्थी, वाचाळ असा बद्ध अभिमान बाळगून लाेकांची निंदानालस्ती करण्यात आनंद मानत असताे. मात्र, असे वागूनही लाेकांनी आपल्याला चांगला म्हणावे, माेठेपणा द्यावा अशी त्याची अपेक्षा असते.
परमार्थाचे अस्तित्वच त्याला माहीत नसल्यामुळे त्याविषयी ताे पूर्णपणे अज्ञानी असताे. मात्र, देहाेपभाेगाच्या सुखाचे विविध मार्ग त्याला माहीत असतात आणि ऐहिक प्रपंचाविषयी त्याचे स्वार्थमूलक ज्ञान परिपूर्ण असते. एकदा स्वतःचे सुख हाच सर्व आयुष्याचा परीघ ठरविला की, मग त्या वर्तुळातच ताे सतत िफरत राहताे. त्या सुखाच्या मागे धावत राहिल्याने ताे सदैव अतृप्त आणि असमाधानी असताे. एका राजाची गाेष्ट आहे. राजा सदैव राज्याची काळजी करण्यात चिंतामग्न असायचा आणि त्याची हजामत करण्यासाठी राेज येणारा न्हावी सदैव हसतमुख व आनंदी असायचा. राजाला काेडे उलगडेना की राजवैभव असून, मी चिंतित आहे आणि गरिबीतही हा आनंदात आहे. त्याच्या प्रधानाने राजाला युक्ती सांगितली आणि त्याप्रमाणे न्हाव्याच्या घरात रात्री 99 माेहाेरांची थैली हळूच टाकून दिली.